डॉ. शामाप्रसादांचे स्वप्न मोदींनी पूर्ण केले : आ. सुधीरदादा गाडगीळ
सांगली दिनांक २३ जून : “डॉ. शामाप्रसादांचे स्वप्न मोदींनी पूर्ण केले असे प्रतिपादन आ. सुधीरदादा गाडगीळ यांनी केले
डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी आ. सुधीरदादा गाडगीळ यांच्या कार्यालयात साजरी करण्यात आली. मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अनेक मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केले यावेळी बोलताना आ. गाडगीळ म्हणाले “देशाची घटना तयार झाल्यावर काश्मीरसाठी स्वतंत्र पंतप्रधान आणि स्वतंत्र राष्ट्रध्वज मान्य करण्यात आला. एकाच देशात दोन पंतप्रधान आणि दोन राष्ट्रध्वज अशी अभूतपूर्व परिस्थिती पं. नेहरूंच्या काँग्रेसने केली. याविरुद्ध देशाचे शिक्षणमंत्री पद भूषवलेल्या आणि तत्कालीन भारतीय जनसंघाचे अध्यक्ष असलेल्या डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांना श्रीनगर मध्ये अटक करण्यात आली. एका सामान्य झोपडीत त्यांना डांबून ठेवण्यात आले. आणि तेथेच त्यांचा मृत्यू झाला काश्मीर साठी असलेले ३७० कलम हटविण्याची हिमंत कोणाची नव्हती .
डॉ. मुखर्जींच्या विचाराचा वारसा असलेल्या भाजपचे सरकार केंद्रात आले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी वादग्रस्त असणारे ३७० हे कलम रद्द करण्याचे धाडस दाखवून डॉ मुखर्जींचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले नाही. जवळपास ७० वर्षांनंतर डॉ मुखर्जींच्या हौतात्म्याला यश आले. आणि डॉ. मुखर्जींचे स्वप्न मोदिनी पूर्ण केले. बंगालच्या भीषण दुष्काळात दुष्काळ निवारणासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले” असे मत आ. सुधीरदादा गाडगीळ यांनी व्यक्त केले.
यावेळी ज्येष्ठ नेते प्रकाश तात्या बिरजे, नगरसेवक संजय कुलकर्णी, गटनेते विनायक सिंहासने , नगरसेविका स्वाती ताई शिंदे, स्थायी सभापती पांडुरंग कोरे, मोहन वाटावे, अविनाश मोहिते, ज्योती कांबळे, शैलजा कोळी, गजानन मोरे, दरीबा बंडगर, गणपती साळुंखे, आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.