Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात मेगाभरती; 'या' जागांसाठी आजच करा अप्लाय

 इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात मेगाभरती; 'या' जागांसाठी आजच करा अप्लाय

कल्पाक्कम (तमिळनाडु), 30 जून : इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र  मेगाभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ही संस्था भारताच्या प्रमुख अणुसंशोधन संस्थांपैकी (Atomic Research Centers) एक आहे. त्यामुळे इथे नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे. IGCAR इथे तब्बल 337 जागांसाठी पदभरती होणार आहे. उच्चशिक्षित उमेदवारांपासून ते दहावी पास उमेदवारांपर्यंत इथे सर्वांना नोकरीची संधी मिळणार आहे.

या जागांसाठी पदभरती

सायंटिफिक ऑफिसर/E - 01

टेक्निकल ऑफिसर/E - 01

सायंटिफिक ऑफिसर/D - 03

टेक्निकल ऑफिसर/C - 41

टेक्निशियन/B (क्रेन ऑपरेटर) - 01

स्टेनोग्राफर ग्रेड-III - 04

उच्च श्रेणी लिपिक - 08

ड्राइव्हर (OG) - 02

सिक्योरिटी गार्ड - 02

वर्क असिस्टंट - 20

कॅन्टीन अटेंडंट - 15

स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-I - 68

स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-II - 171

एकूण जागा - 337

हे ISRO Recruitment 2021: इंजिनिअर्ससाठी इस्रोमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी

शैक्षणिक पात्रता

सायंटिफिक ऑफिसर/E - Ph.D. (मेटलर्जी/मटेरियल इंजिनिअरिंग) आणि 60% गुणांसह B.Tech (मेटलर्जी)

टेक्निकल ऑफिसर/E - 60% गुणांसह BE/B.Tech (केमिकल) आणि 09 वर्षे अनुभव

सायंटिफिक ऑफिसर/D - Ph.D/ 60% गुणांसह B.E/B.Sc/M.Sc/ME

टेक्निकल ऑफिसर/C - 60% गुणांसह M.Sc. / M.Tech / B.E./B.Tech/BSc

टेक्निशियन/B (क्रेन ऑपरेटर) - 60% गुणांसह 10वी/12वी (PCM) उत्तीर्ण आणि क्रेन ऑपरेटर प्रमाणपत्र

स्टेनोग्राफर ग्रेड-III - 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण आणि शॉर्ट हैंड 80 श.प्र.मि., इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.

उच्च श्रेणी लिपिक - 50% गुणांसह पदवीधर

ड्राइव्हर (OG) - 10वी उत्तीर्ण (ii) हलके आणि अवजड वाहन चालक परवाना

सिक्योरिटी गार्ड - 10वी उत्तीर्ण किंवा सशस्त्र दलाचे समतुल्य प्रमाणपत्र.

वर्क असिस्टंट - 10वी उत्तीर्ण

कॅन्टीन अटेंडंट - 10वी उत्तीर्ण

स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-I - 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा

स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-II - 60% गुणांसह 10वी/12वी (PCM) उत्तीर्ण ITI

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 जुलै 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.