कृष्णा नदीवरील कृष्णाघाट मिरज येथील पूल दुरूस्तीकामी 10 ते 20 जुलै कालावधीत सकाळी 11 ते 11.30 वेळेत वाहतुकीस बंद -जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
सांगली, दि. 09, : मिरज-अर्जुनवाड-शिरोळ रा.मा.क्र. 153 वरील कृष्णा नदीवरील कृष्णाघाट मिरज येथील पूल दुरूस्तीकामी दि. 10 ते 20 जुलै 2021 या कालावधीत सकाळी 11 ते 11.30 या वेळेसाठी वाहतुकीस बंद करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
वाहतुक सुरक्षा उपाययोजनेव्दारे वाहतुक नियंत्रीत करावी. जनतेच्या व वाहन चालकांच्या माहितीसाठी योग्य ठिकाणी दिशाचिन्हे व माहिती लावण्यात यावी. या उपाययोजना कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस अधीक्षक सांगली, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सांगली यांनी एकत्रितपणे कराव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.