Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गांधी नेहरुंची विचारधाराच भारताचे तारणहार...!! बलराम भदौरीया.. सचिव अ. भा. काँग्रेस सेवा दल

 गांधी नेहरुंची विचारधाराच  भारताचे तारणहार...!! बलराम भदौरीया.. सचिव अ. भा. काँग्रेस सेवा दल 

काँग्रेस पक्षाने भारत स्वतंत्र केला.. गांधी नेहरुंच्या त्यागातून भारताचा चौफेर विकास झाला. काँग्रेस सेवा दलाने काँग्रेस पक्ष तळागाळात रुजवला आहे. समर्पित व निष्ठावान कार्यकर्ते व नेत्यांनी काँग्रेस व सेवा दलाच्या माध्यमातून खूप मोठी देशसेवा केली आहे. यामध्ये सांगली आणि महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे असे गौरवोद्गार अखिल भारतीय काँग्रेस सेवा दल सेक्रेटरी (संघटक)उत्तर प्रदेशचे बलरामजी भरौदीया यांनी काढले. 

ते आज सांगली दौऱ्यात काँग्रेस भवनमध्ये मा. पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित काँग्रेस सेवा दल व पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना म्हणाले, '' भ्रष्टाचार निर्मूलन, कुटुंब नियोजन, वृक्षारोपण, महागाई विरोधी आंदोलन, राष्ट्रीय ऐक्य व बंधुभाव संवर्धनकामी कॉंग्रेस आणि सेवा दलाची कामगिरी श्रेष्ठ दर्जाची आहे. सांगली काँग्रेसने व सेवा दल साथींनी केलेल्या सन्मानाने मी भावविभोर झालो. सांगली काँग्रेस सेवा दल व काँग्रेस पक्षाचे काम चांगले चालू आहे. ''

यावेळी काँग्रेस सेवा दल जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी स्वागत तर उपाध्यक्ष पैगंबर शेख यांनी प्रास्ताविक केले. 

महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेस उपाध्यक्ष प्रा.एन.डी.बिरनाळे म्हणाले, '' काँग्रेस सेवा दल ही ग्रासरुट फ्रंटवर काम करणारी देशव्यापी काँग्रेसची संघटना आहे. देशहितासाठी गांधीवादी विचारांचा प्रसार व प्रचार करणाऱ्या या संघटनेने असहकार व चले जाव चळवळीत भरीव कामगिरी केली आहे. १९२३ मध्ये काँग्रेसच्या काकीनाडा अधिवेशनात हिंदुस्थान सेवा दल स्थापनेचा ठराव झाला. १९३१ मध्ये याचे काँग्रेस सेवा दल असे नामकरण झाले. राष्ट्रीय ऐक्य, सत्य व अहिंसा या तत्त्वासाठी सेवा दल काम करते. काँग्रेस सदस्य नोंदणीत सेवा दलाचे योगदान लक्षवेधी ठरली आहे. बंधुभाव व देशप्रेम याबाबतीत संघटनेचे काम वाखाणण्याजोगे आहे. पंडीत नेहरू हे काँग्रेस सेवा दलाचे पहिले अध्यक्ष होत.सांगली जिल्ह्यात सहकार तपस्वी स्व. गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र सांगली जिल्हा शहर कॉंग्रेस अध्यक्ष मा. पृथ्वीराज बाबा पाटील हे काँग्रेस व सेवा दलाचे उपक्रम धुमधडाक्यात राबवित आहेत. ''

यावेळी प्रा.एन.डी.बिरनाळे व सेवा दलाचे माजी अध्यक्ष अनिल सुगाण्णावर यांच्या हस्ते भरौदीया यांचा सुती हार.. काँग्रेस पक्षाचा दुपट्टा व बुके देऊन सत्कार करण्यात आला. 

मनपा वार्ड क्र. ९ चे सेवा दल अध्यक्ष अशोक वारे यांनी आभार मानले. याप्रसंगी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष देशभूषण पाटील, कवलापूरचे सुरेश पाटील, नामदेव पठाडे, शिवानंद तेलसंग, सेवा दल मिरज तालुका सरचिटणीस संगाप्पा पाटोळे, हणमंत वडेर, पत्रकार बाळासाहेब खोत व सुकुमार पोतदार आणि कॉंग्रेस व सेवा दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.