Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आमदार गिरीश महाजनांचा आरोप; अपयश झाकण्यासाठी दोन दिवसांचे अधिवेशन

 आमदार गिरीश महाजनांचा आरोप; अपयश झाकण्यासाठी दोन दिवसांचे अधिवेशन

जामनेर जि.जळगाव : राज्यात जनतेचे शेकडो प्रश्न प्रलंबित आहेत. यामुळे राज्य सरकार कोरोनाच्या आडून अधिवेशन घेण्याचे टाळत आहे. मुळातच महाविकास आघाडी शासनात एकमत नसल्याने अपयश झाकण्यासाठी अधिवेशन कमी कालावधीत आटोपण्याचा घाट रचल्याचा आरोप माजीमंत्री व भाजपचे नेते आमदार गिरीश महाजन यांनी केला आहे. दोन दिवसांच्या अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभुमीवर महाजन यांनी 'लोकमत' ला सांगितले की, कोरोना काळात मंत्र्यांच्या कार्यक्रमाला व मोर्चांना होणारी गर्दी शासनाला दिसत नसावी. अधिवेशनात जनतेचे प्रश्न मांडले जाऊ नये, यासाठी हा आटापीटा चालविला आहे. केवळ सोपस्कार म्हणून दोन दिवसांचे अधिवेशन घेतले जात आहे. जनतेच्या प्रश्नांवर अधिवेशनात सरकारला धारेवर धरु, असा इशाराही त्यांनी दिला.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.