पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही ईडी चौकशी व्हावी - नाना पटोले
नागपूर: सध्या राज्यात ईडीवरून राजकारण तापलं आहे. अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर ईडीने कारवाईचा दांडूक उगारल्यानं महाविकास आघाडीच्या चिंतेत वाढ झाली आहे. ईडी केंद्र सरकारच्या अधिकार क्षेत्रात असल्यानं ईडीचा गैरवापर होत असल्याचा आरोप संपुर्ण देशभरातून करण्यात येत आहे. त्यातच आता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीका करत मोठी मागणी केली आहे.
पंतप्रधान सहायता निधीत झालेल्या भ्रष्टाचारावर मोठ्या प्रमाणावर आरोप झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील आरोप झाले आहेत. मग त्यांचीही ईडीची चौकशी व्हावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. लोकांच्या पैशाचा दुरुपयोग करणाऱ्यांची नक्कीच चौकशी व्हायला हवी, असंही नाना म्हणाले.
आम्ही वारंवार यांच्यावर ईडी लावा, सीबीआय लावा असं म्हणत नाही. भाजपवाले सत्तेत होते, तेव्हाही यांच्यावर आरोप लागायचे तेव्हा देवेंद्र फडणवीस स्वतः विधानसभेत सांगायचे की हे निर्दोष आहेत. त्यावेळी कुठे गेली होती ईडी? तेव्हा कुठे गेले होते सीबीआय? पण आता मुद्दाम ईडी आणि सीबीआयची भीती दाखवून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न भाजपचा सुरू आहे, असा आरोप देखील त्यांनी केला आहे.
दरम्यान, केंद्राने दाखल केलेली मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे भाजपचा खोटारडेपणा उघड झाला असून त्यांच्याकडे आता सांगण्यासारखं काही नसल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच आरक्षणाचा मुद्दा संपुष्टात आणणे हा भाजपचा आणि आरएसएसचा डाव आहे, असंही नाना पटोले पुण्यातल्या पत्रकार परिषदेत म्हणाले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.