Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खोतवाडी ओढ्यावरील पुलासाठी १. ७५ कोटी अधिवेशनात मंजूर पृथ्वीराज पाटील यांची माहिती

खोतवाडी ओढ्यावरील पुलासाठी १. ७५ कोटी  अधिवेशनात मंजूर  पृथ्वीराज पाटील यांची माहिती


सांगली, दि. ५ : निमणी नागाव, खोतवाडी, बिसूर, बुधगाव  या रस्त्यावरील खोतवाडीच्या ओढ्यावरील पूल बांधण्यासाठी १.७५ कोटी रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर केला, आता अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव नाबार्डकडे जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी आज येथे दिली.

हा रस्ता खोतवाडीच्या ओढा पात्रातून जातो. ओढ्याला पूर येतो, त्यावेळी तर वाहतुकीला खूप मोठा अडथळा निर्माण होतो. संपूर्ण पावसाळ्यातच वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो. या रस्त्यावरील दोन्ही बाजुच्या गावांचा संपर्क तुटतो. एवढेच नव्हे तर सांगली शहराशीही त्यांचा संबंध तुटतो, त्यामुळे या पुलाचे काम होणे अत्यंत महत्त्वाचे होते. त्याकरिता नाबार्ड - २७ अंतर्गत निधी मंजूर करावा असे पत्र सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांना आपण दि. १८ जून, २०२१ रोजी दिले होते. हा प्रस्ताव आता नाबार्डकडूनही लवकरच मंजूर होईल असे श्री. पाटील यांनी सांगितले.

ना. चव्हाण यांनी या पुलाची गरज ओळखून त्यासाठी  निधी मंजूर केला आहे. अंतिम मंजुरीनंतर खोतवाडी ओढ्यावरील पुलाचे काम होण्यास मदत होणार आहे, तसेच या भागातील लोकांच्या जाण्यायेण्याची सोय होणार आहे, असे श्री. पाटील यांनी सांगितले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.