महापालिका क्षेत्रातील व्यापार सुरू करायची परवानगी द्यावी – व्यापारी संघटनेची मागणी
सांगली महापालिका क्षेत्रात रुग्ण संख्या व पॉझिटिव्हिटी रेट कमी असल्याने व्यापार व दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी आज जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे व्यापर्यांंचे शिष्टमंडळाचे वतीने करण्यात आली सांगली शहरातील हरभट रोड, कापड पेठ, सराफ कट्टा, गणपती पेठ परिसरातील सुमारे 400 व्यापारी एकत्र येऊन आमची दुकाने सुरू करावीत अशी मागणी करण्यात आली सदर व्यापार्यांतची राष्ट्रवादी नेते माजी नगरसेवक शेखर माने व त्याची एकत्रित मीटिंग घेण्यात आली सदरची मिटींगला व जमावाला समजूत काढून पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी संवाद साधून देण्यात आला व जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्याकडे व्यापार सुरू करण्याचे निवेदन देण्यात आले त्यामध्ये व्यापर्यां च्या वतीने प्रमुख मागण्या सांगली जिल्हा व महापालिका क्षेत्रातील कोरोंना चाचण्या पॉझिटिव्हिटी विभाजन करण्यात यावे व महापालिका क्षेत्रात पॉझिटिव्हिटी रेट कमी असल्यास आमची दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी महापालिका क्षेत्रात RTPCR चाचण्या वाढवण्यात याव्यात, व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊ नये. सदर कारवाई तत्काळ थांबवावी अशी करण्यात आली त्यावर जिल्हाधिकारी यांचे व्यापार सुरू करण्याच्या दृष्टीकोणातून सकारात्मक असून रविवार पर्यंत पॉझिटिव्हिटी रेट तपासून लवकरात लवकर दुकाने सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले तसेच व्यापर्यांच्या वतीने पालकमंत्री यांना भेटण्याचे ठरविण्यात आले असून त्यांनासुद्धा व्यापार्यांच्या व्यथा सांगण्यात येणार आहेत॰देण्यात आले.
सदर निवेदन प्रत्यक्ष भेटून देताना राष्ट्रवादी नेते श्री.शेखर माने, हेमंत खंडागळे व माजी नगरसेवक बाळासाहेब काकडे तसेच, श्री.शामसुंदर पारीक श्री.राजेश चावला, श्री.चेतक देवांग, श्री. गुरुनाथ कुलकर्णी ,महेश उरूंकर आदि उपस्थित होते
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.