कर्मवीर पतसंस्थेच्या महावीरनगर, मालगांव रामानंदनगर शाखेचा पहिला कर्मवीर पतसंस्थेच्या विविध शाखांचा पहिला वर्धापनदिन साजरा.
यावेळी संस्थेचे चेअरमन श्री रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी संस्थेच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. सभासदांना चांगली सेवा देणे, त्यांची प्रगती करणे यासाठी संस्थेने एक रोडमॅप समोर ठेवल्याचे त्यांनी सांगितले.
महावीरनगर- सांगली शाखेने एक वर्षात ४ कोटी ५८ लाख ठेवी गोळा केल्या असून कर्ज २ कोटी ६ लाख इतके वाटप केले आहे. चेअरमन श्री. रावसाहेब पाटील यांनी शाखेच्या प्रगतीचे कौतुक केले. तसेच येथील सभासदांनी शाखेला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल आभार मानले व या शाखेचा महावीरनगरच्या प्रगतीस सदैवतभार लागेल असे नमूद केले.
यावेळी महावीरनगर शाखेचे सल्लागार श्री. सतिश बाबुराव आरवाई. श्री. अशोक कृष्णा फावडे यांचेसह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर सभासद ठेवीदार मोठा संख्येने उपस्थित होते.
मालगांव शाखेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. पहिल्याच वर्षात मालगांव शाखेच्या ठेवी ४ कोटी ३५ लाख झझाल्या आहेत. ३ कोटी २५ लाखाचे कर्ज वाटप केले आहे.
यावेळी संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संस्था ग्राहकांना सदैव चांगली सेवा देण्यास वचनबध्द असलेचे त्यांनी सांगितले शाखेला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद असल्यामुळे या शाखेसाठी स्वमालकीची जागा खरेदी करणेबाबत वार्षिक सभेत ठराव केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी श्री महावीर रुकडे, श्री. अजित भंडे, सतिश वागळे रा भरतेश्वर
पाटील, श्री अशोक पाटील श्री अविनाश पाटील, प्रेमचंद भंड, भरतेश्वर बारणे..
विष्णु पवार, राजेश बाहेती, किरण चौगुले आदि मान्यवर उपस्थित होते.
रामानगर शाखेचा पहिला वर्धापनदिन उत्साहात साजरा झाला. पहिल्या वर्षान शाखेने ४ कोटी २० लाखाच्या ठेवी गोळा केल्या आहेत. तर ४ कोटी ३० लाखाचे कर्ज वाटप केले आहे. रामानंदनगर मध्ये शाखेला ग्राहकांचा अतिशय चांगला प्रतिसाद लाभत आहे. रामानंदनगर च्या आर्थिक उन्नतीसाठी संस्था नेहमी योगदान देईल अशी ग्वाही चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी दिली.
या कार्यक्रमास सत्यविजय बँकेचे चेअरमन श्री. बाळासाहेब पवार, सुतगिरणिचे माजी चेअरमन राजारामबापू पाटील, डॉ. धैर्यशिल खंभाळकर वसंतदादा साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव सावंत, रामानंदनगर चे माजी सरपंच श्री. जयसिंगराव नावडकर ग्रा.प. सदस्य प्रल्हाद शितापे, सत्यविजय बँकेचे संचालक श्री. संतोष गायकवाड, रावसाहेब वाकळे, प्रा. सिराज पिरजादे, प्रल्हाद चौगुले अँड महेश चौगुले पलुस व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री कुमार माळी उद्योजक महावीर चौगुले वर्धमान पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र चौगुले यांचे सह
रामानंदनगर शाखेचे सल्लागार राजाराम ( बापू ) नाभिराज पाटील संजयकुमार चौगुले अख्तर अल्लाउद्दिन पिरजादे पलुस शाखेचे सल्लागार अॅड. सतिश नाभिराज चौगुले, राजाराम मदवाने राजेंद्र विश्वनाथ बिडवे उपस्थित होते.
हे सर्व वर्धापन दिनाचे सोहळे संस्थेच्या व्हाईस चेअरमन श्रीमती भारती चोपडे. संचालक अॅड. एस.पी. मगदूम, डॉ. नरेंद्र खाडे डॉ. रमेश ढबू ओ.के. चौगुले, लालासाहेब थोटे वसंतराव नवले मुख्य अधिकारी अनिल मगदूम यांचे उपस्थितीत संपन्न झाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.

