आधार कार्ड असेल तर LIC च्या या पॉलिसीबाबत घ्या जाणून, होईल लाखोंचा फायदा
नवी दिल्ली, 13 सप्टेंबर: भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसीच्या वतीने विविध पॉलिसी उतरवल्या जातात. LIC नेहमी नवनवीन योजना सादर करत असते. या वेळी कंपनीने महिलांसाठी एक नवी योजना आणली आहे जी खूप लवकर लोकप्रिय झाली आहे. या पॉलिसीचं नाव 'आधार शीला' असं असून या नावामध्ये आधारचा उल्लेख करण्यामागे ही एक विशेष कारण आहे. ज्या भारतीय नागरिक महिलेकडे आधार कार्ड आहे त्या महिलेलाच आधार शीला या एलआयसी योजनेचा फायदा घेता येतो. 1 फेब्रुवारी 2020 ला ही योजना लाँच झाली. या योजनेत लाईफ कव्हरसोबतच तुमची बचतही होते. या पॉलिसीमध्ये दररोज 29 रुपयांची गुंतवणूक केली तर ती मॅच्युअर झाल्यावर त्या महिलेला 4 लाख रुपये मिळतील. या योजनेचा काळ सुरू असताना तुम्हाला कर्जही घेता येऊ शकतं. 8 वर्षांपासून ते 55 वर्षांपर्यंतची महिला ही पॉलिसी खरेदी करू शकते. कमीतकमी 10 आणि जास्तीत जास्त 20 वर्षांपर्यंत या योजनेत गुंतवणूक केली जाऊ शकते. तसंच ही पॉलिसी जेव्हा मॅच्युअर होईल तेव्हा महिलेचं वय 70 वर्षांहून अधिक असता कामा नये.
या योजनेमध्ये कमीतकमी 75 हजार रुपयांचा तर जास्तीतजास्त 30 लाख रुपयांचं विमा कवच तुम्हाला घेता येऊ शकतं यात तुम्ही ॲक्सिडेंट बेनिफिटचा रायडर घेऊ शकता. इतका भरावा लागेल प्रीमियम जर एखाद्या मुलीचं वय 20 वर्षं आहे आणि तिने 20 वर्षांच्या काळासाठी आधार शीला ही पॉलिसी विकत घेतली आणि 3 लाख रुपयांचा विमा उतरवला तर तिला वर्षाला साधारण 10 हजार 868 रुपये प्रीमियम भरावा लागेल. त्याच्या पुढच्या वर्षी हा प्रीमियम कमी होऊन 10 हजार 649 रुपये इतका होईल. विमा पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर तिला 4 लाख रुपये मॅच्युरिटी बेनिफिट आणि विम्याची रक्कम आणि रॉयल्टी बोनस म्हणून 2 लाख रुपये मिळतील.
प्रीमियम पेमेंट आधार शीला या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक प्रीमियम हप्ता भरू शकता. जर तुम्ही प्रीमियम भरायला विसरलात तर तुम्हाला 1 महिन्याचा ग्रेस पीरियड मिळेल. पण जर तुम्ही दरमहा म्हणजे प्रत्येक महिन्याला हप्ता भरायचं ठरवलं तर तुम्हाला 15 दिवसांचा ग्रेस पीरियड मिळेल. कॅश बेनेफिट पॉलिसी सुरु झाल्यानंतर 5 वर्षांत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला सम अशुअर्ड रक्कम मिळेल पण जर त्यानंतर विमा धारकाचा मृत्यू झाला तर वारसाला अश्युअर्ड रक्कम आणि रॉयल्टी बोनस दोन्हीही मिळेल. तुम्ही जितक्या वर्षांसाठी पॉलिसी खरेदी केली आहे ती मुदत संपल्यानंतर तुम्ही सगळी रक्कम एकदम घेऊ शकता किंवा हप्त्याहप्त्यांनी ही रक्कम घेऊ शकता. जर तुम्ही सलग दोन वर्षं प्रीमियम भरू शकला नाहीत तर तुमची पॉलिसी कधीही सरेंडर करता येईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.

