स्टेट बँक ऑफ इंडिय च्या ग्राहकांसाठी महत्वाची सूचना; बँकिंग सेवा चालू ठेवण्यासाठी 'हे' काम त्वरित करा..
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना 30 सप्टेंबर 2021 च्या आधी त्यांचे पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक करण्यास सांगितले आहे. जर बँकेच्या ग्राहकांनी हे निर्धारित वेळेत केले नाही तर त्यांना बँकिंग सेवा मिळणे अवघड होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सरकारने पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. सध्या पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर आहे. अशा परिस्थितीत एसबीआयने आपल्या ग्राहकांना शक्य तितक्या लवकर पॅन कार्डला आधार कार्डशी जोडण्याचे आवाहन केले आहे.
जाणून घ्या, पॅनला आधार कसे लिंक करायचे?
* सर्वात आधी इनकम टॅक्सच्या वेबसाइटच्या मदतीने, तुमचे पॅन आधारशी लिंक आहे की, नाही ते पाहा.
* यासाठी इनकम टॅक्सच्या वेबसाइटला भेट द्या.
* आधार कार्डवरील नाव, पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक अपलोड करा.
* आधार कार्डमध्ये जन्माचे वर्ष नमूद असेल तरच स्क्वेअरवर टिक करा. त्यानंतर कॅप्चा कोड टाका.
* यानंतर लिंक आधारवर क्लिक करा. तुमचे पॅन कार्ड आधार कार्डला लिंक होईल.
एसएमएसद्वारे होईल लिंक?
एसएमएसद्वारे पॅन कार्डला आधार कार्डसोबत लिंक करता येईल. यासाठी तुम्हाला तुमच्या फोनवर UIDPAN टाईप करावे लागेल. यानंतर 12अंकी आधार क्रमांक आणि 10 अंकी पॅन क्रमांक लिहावा लागेल. आता हा मेसेज 567678 किंवा 56161 वर पाठवा. तुमचे पॅन कार्ड आधार कार्डला जोडले जाईल.
कसे चालू करता येते निष्क्रिय पॅन?
निष्क्रिय पॅन कार्ड पुन्हा कार्यान्वित केले जाऊ शकते. यासाठी तुम्हाला एसएमएस पाठवावा लागेल. तुम्हाला मेसेज बॉक्समध्ये तुमच्या नोंदणीकृत मोबाईलमधून 12 अंकी पॅन टाकावा लागेल. यानंतर, स्पेस देऊन 10-अंकी आधार क्रमांक टाका. त्यानंतर हा संदेश 567678 किंवा 56161 वर SMS करा.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.

