काँग्रेस आ.पी.एन.पाटील यांच्यावर गुन्हा दाखल !
आदिती राजेश पाटील (सध्या,रा.कराड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. आ.पी.एन.पाटील यांच्यासह त्यांचा मुलगा राजेश पाटील, मुलगी टीना महेश पाटील यांच्यावर ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदिती यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,शिवीगाळ करून मारहाण करत एक कोटीची मागणी केल्याचे म्हटले आहे.पती,सासरे व नणंद यांनी संगनमत करून शारीरिक व मानसिक त्रास देऊन छळ केला आहे. फसवणूक करणे,शिवीगाळ करून मारहाण करणे, धमकी देणे अशा प्रकारच्या विविध कलमान्वये कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदिती पाटील सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची पुतणी तर ज्येष्ठ नेते सुभाष पाटील यांच्या कन्या आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
