Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नववीच्या मुलाने घेतली पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा

 नववीच्या मुलाने घेतली पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा


सांगलीः कोरोनामुळे शाळा ,महाविद्यालये  ऑनलाईन झाली...मुले घरात बसून कंटाळली... अनेक मुलांना काय कराव हेच कळेना...एकलकोंडेपणा वाढत चाललाय...अशा परिस्थितीत  एका चौदा वर्षाच्या मुलाने राष्ट्रीय स्तरावर एक सुंदर पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा घेऊन तब्बल 91 स्पर्धकांना बोलते करीत सहभागी मुलांना  चित्राविषयी ऑनलाईन बोलायला लावल. एवढ्या लहान वयात मोठ्यांना तोंडात बोट घालायला लावणार्‍या या अभिनव उपक्रमाच सध्या सर्वत्र कौतूक होत आहे.ऑनलाईन व्हर्च्युअल मोडवर ही स्पर्धा सुश्रुतने घेतली.

सांगली जिल्ह्यातील कवठेपिरान गावातील सुश्रुत राकेश माळी अस या विद्यार्थ्याचे नाव आहे. पेठवडगांच्या  डॉ.सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेतोय. सुश्रुतने विविध स्पर्धामध्ये शंभरहून अधिक बक्षिसे मिळवली आहेत. सतत अभ्यास, नवनवीन संशोधनाची आस असलेला सुश्रुतने एका सायन्स प्रोजेक्टवर काम केलेले आहे. जनरेटींग इलेक्ट्रीसिटी फ्रॉम वेस्ट मटेरियल्स वुईथ रीड्युसिंग एअर पोल्युशन या विषयावर  प्रकल्प तयार केला होता. या प्रकल्पाचे सर्वत्र कातूक झाले आहे.

  सुश्रुतच्या दोन्ही बहिणी श्रुती आणि स्मृती या  इंजिनिअरचे शिक्षण घेत आहेत.त्यांच्या कॉलेजमध्ये विविध स्पर्धा, शिक्षण ऑनलाईन होत होते. हे सगळ पाहून सुश्रुतच्याही मनात आले की आपणच  ऑनलाईन एखादी स्पर्धा घेतली तर... आणि वडील राकेश माळी यांच्या मार्गदर्शनाने राष्ट्रीय स्तरावरची पोस्टर प्रेझेटेंशन स्पर्धेची संकल्पना सुचली. सुश्रुतने 5 वी ते 7वी आणि आठवी ते दहावी अशा दोन गटात टीचर्स अ‍ॅज अ फौंडेशन ’ या विषयावर पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा ऑनलाईन घेतली. निमित्त होते शिक्षक दिनाचे...या स्पर्धेत चक्क 90 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सांगली, नाशिक, कोल्हापुर, नागपुर, नगर यासह अनेक जिल्ह्यासह  कर्नाटक मधूनही स्पर्धक  ऑनलाईन सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी नववीत शिकणार्‍या सुश्रुतने स्पर्धेसाठी लिंक तयार करण्यापासून परीक्षक नेमणे,प्रायोजक नेमणे सर्व तयारी एकट्याने केली होती. सुश्रुतचा उत्साह पाहून  परीक्षकांनीही त्याच्या या उपक्रमाचे भरभरुन कौतूक केले. या पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचा  निकाल परीक्षकांमार्फत जाहिर करुन सुश्रुतने बक्षिसमारंभही ऑनलाईन केला. या स्पर्धेतील 5वी-7वी या गटात श्रीनिधी लंबे, आदिती झिनगे ,डॉ.सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूल यांनी अनुक्रमे प्रथम,व्दितीय क्रमांक मिळवला, तर जोयल मोहिते, अल्फोन्सा स्कूल,मिरज याने तृतीय क्रमांक मिळवला. तर उत्तेजनार्थ बक्षिस कांदबरी करोळे, आयडीयल स्कूल,यांनी मिळवले. इयत्ता 8वी-10वी मधील गटात स्वरा सांवत,अनुष्का काशिद, सुंदराबाई दडगे हायस्कूल,सांगली यांनी प्रथम क्रमांक मिळवला. संजना भट्ट,अल्फोन्सा स्कूल,मिरज,शुभंकर पोळ, बिरनाळे  पब्लिक   स्कूल,उत्तेजनार्थ बक्षिस शर्वरी बंडगर,राणी सरस्वती कन्या शाळा यांनी  मिळवले. परीक्षक म्हणून एम.ए.मुल्ला, संदिप पवार, शिवम बुटाले, ज्योती पांचाळ यांनी काम पाहिले. अशी अभिनव स्पर्धा भरवण्यासाठी सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य डॉ.सरदार जाधव ,सागर फरांदे, चित्रा हगलहोळे, तौसिफ जमादार, यांचे सहकार्य लाभले. 

  वडील राकेश माळी ,आई वर्षा आणि इंजिनिअरचे शिक्षण घेत असलेल्या बहिणी श्रृती,स्मृती आणि नववीचे शिक्षण घेणारा सुश्रुत असे हे कुटुंब...वडील राकेश हे इंजिनिअरचे शिक्षण घेऊन शेतीचा व्यवसाय सांभाळत आहेत. मुलांनी उच्च शिक्षण घ्याव,यासाठी  वडील सतत कार्यरत असतात.

कोरोनामुळे शाळा बंद असताना घरात कोंडलेल्या मुलांना चित्रांच्या दुनियेत आणणारा सुश्रुत माळी यानेही विविध स्पर्धामधून पन्नासहून अधिक प्रमाणपत्रे  मिळवली आहेत, सतत नविन काही तरी संशोधन करीत रहाण यासाठी अभ्यासात व्यस्त असतो. त्याला भविष्यात रोबोटिक्स टेक्नॉलॉजीचे शिक्षण घेण्याची इच्छा आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या  भारतातील सर्वात मोठी हॅकेथॉन स्पर्धेत आठ हजार स्पर्धक संघ सहभागी झाले होते.यात सुश्रुतने केलेल्या प्रकल्पाचे सर्वानीच कौतूक केले  होते.सुश्रुत ने केलेल्या प्लास्टीक,रबर सारखा कचरा जाळनू त्यापासून वीजनिर्मिती करण्याच्या प्रकल्पाचेही कौतूक झाले आहे.

 सध्या सुश्रुत प्लास्टीक,रबर या वेष्ट कचऱ्यापासून विजनिर्मिती करण्याबरोबर हा धूर हवेत सोडल्यामुळे हवेचे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी काही तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास सुरु आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.