Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली जिल्हयातील कराड-तासगाव राष्ट्रीय महामार्ग व पेठ-सांगली-मिरज राष्ट्रीय महामार्ग यांना जोडणाऱ्या पाचवा मैल ते सांगली राज्यमार्ग रस्ता रुंदीकरणासह विकसित करण्याची मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली..

सांगली जिल्हयातील कराड-तासगाव राष्ट्रीय महामार्ग व पेठ-सांगली-मिरज राष्ट्रीय महामार्ग यांना जोडणाऱ्या पाचवा मैल ते सांगली राज्यमार्ग रस्ता रुंदीकरणासह विकसित करण्याची मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली..


सांगली दिनांक १० सप्टेंबर  :- सांगली जिल्हयातील कराड-तासगाव राष्ट्रीय महामार्ग व पेठ-सांगली-मिरज राष्ट्रीय महामार्ग यांना जोडणाऱ्या पाचवा मैल ते सांगली राज्यमार्ग रस्ता रुंदीकरणासह विकसित करण्याची मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे. आमदार सुधीर गाडगीळ यांनी मुंबईत बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पाचवा मैल ते सांगली राज्यमार्ग रस्ता रुंदीकरणाची गरज असल्याने त्याला लवकर मंजुरी मिळावी अशी मागणी केली. पलूस ते पाचवा मैल ते सांगली या प्रमुख राज्य मार्गामधील पाचवा मैल ते सांगली हा रस्ता राष्ट्रीय महामार्गातून वगळला गेला आहे.  हा रस्ता अत्यंत रहदारीचा तसेच पलूस, कडेगाव, तासगाव या महत्वाच्या तालुक्यांना जोडणारा रस्ता आहे.

 या भागातील उस, द्राक्षे या नगदी पिकावर आधारीत मोठे व्यवसाय असून अवजड वाहनांची मोठी वाहतूक या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने या रस्त्याचे विशेष महत्त्व आहे. जिल्हयातील कराड-तासगाव राष्ट्रीय महामार्ग व पेठ-सांगली-मिरज राष्ट्रीय महामार्ग या विकसित होत असलेल्या महत्वाच्या रस्त्यांना जोडणाऱ्या पाचवा मैल-वसगडे-नांद्रे-कर्नाळ-सांगली हा साधारण १६ किमीचा रस्ता विकसित झाल्यास तासगाव, पलूस भागाचे सांगली शहराशी कनेक्टिव्हिटी होणार आहे. जिल्हयाच्या आर्थिक विकासासाठी हा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. जुना बुधगाव रस्ता येथे नविन रेल्वे ओव्हर ब्रीजला मंजुरी द्या सांगली विधानसभा मतदार संघातील जुना बुधगाव रस्ता महापालिका क्षेत्रातला असून सदर रस्त्यावर मोठी वाहतूक होत असते. सांगली पुणे रेल्वेमार्गावर प्रवासी व मालवाहतुकीमुळे सतत रेल्वे वाहतुक सुरु असते. 


त्यामुळे सतत वाहतुक कोंडी होते. या ठिकाणी ओव्हर ब्रीज नसल्यामुळे नागरिकांना दैनंदिन कामकाजामध्ये प्रचंड अडचणी येत आहेत. तसेच कृष्णा नदीस आलेल्या महापुरामध्ये महापालिका क्षेत्रातील नागरिकांना ओवर ब्रीज नसल्यामुळे स्थलांतरित होणे कठीण झाले होते. तेथे ओवर ब्रीज झाल्यास तेथील नागरिकांची पुराच्या वेळेला स्थलांतरकरणाची समस्या कायमची दुर होईल. त्यामुळे येथे रेल्वे ओव्हर ब्रीजला मंजुरी मिळावी, अशीही मागणी आमदार गाडगीळ यांनी केली आहे. यावेळी सदर मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले..


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.