Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली जिल्हा परिषदेवर आशा व गटप्रवर्तक महिलांची जोरदार निदर्शने !

 सांगली जिल्हा परिषदेवर आशा व गटप्रवर्तक महिलांची जोरदार निदर्शने !


महाराष्ट्र शासनाने अचानक पणे आशा व गटप्रवर्तक महिला व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या kovid 19 चे काम करण्यासाठी दिला जाणारा दरामहा फक्त एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता रद्द केलेला आहे. मुळातच आशा महिलांना दररोज हा 33 रुपये भत्ता मिळत होता .त्यामध्ये त्या दररोज चार ते  पाच तास  काम करत होत्या. गटप्रवर्तक महिलांना तर दररोज साडेसतरा रुपये  भत्ता मिळत होता. तरीही महाराष्ट्र शासनाने हा भत्ता रद्द करून त्यांना covid-19 बद्दल किती पर्वा आहे हे दाखवून दिले आहे. म्हणूनच शिष्टमंडळाच्या वतीने सांगली जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, जर शासन covid-19 भत्ता जोपर्यंत देणार नाहीत तोपर्यंत आशा गटप्रवर्तक महिला covid-19 संदर्भातील कसलेही काम करणार नाहीत. याबाबत शासनाला तातडीने कळविण्यात येईल असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी स्पष्ट केले. चर्चेमध्ये अशी मागणी करण्यात आली की, 1 एप्रिल 2021 पासून ते आजपर्यंत पाच महिन्याचे मानधन आशांना दरमहा दोन हजार व गटप्रवर्तक महिलांना तीन हजार रुपये अद्याप दिलेले नाहीत ते ताबडतोब मिळणे आवश्यक आहे.

 असे न झाल्यास 24 सप्टेंबरपासून आशा व गटप्रवर्तक महिलांना बेमुदत आंदोलन करावे लागेल. असे Zp समोर निदर्शने करताना युनियनच्या जनरल सेक्रेटरी कॉ सुमन शंकर पुजारी यांनी जाहीर केले. गेट समोर बोलताना कॉ शंकर पुजारी यांनी सांगितले की एका बाजूने covid-19 तिसरी लाट येण्याचा धोका आहे तर दुसर्‍या बाजूला आरोग्य खात्यातील पंधरा हजारापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून 1 सप्टेंबर पासून काढून टाकल्यामुळे covid-19 साथ धोका आणि महामारी सरकारला वाढवायचे आहे का? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणूनच कामावरून कमी केलेल्या सांगली जिल्ह्यातील 22 कंत्राटी आरोग्य महिलांना तातडीने कामावर घ्यावे अन्यथा त्यासंदर्भातही आंदोलन करावे लागेल असा इशारा देण्यात आला. इतरही पंधरा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाक काढून  याचा अर्थच असा आहे की इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना जास्त काम करावे लागणार व आशा व गटप्रवर्तक महिलांना सुद्धा जास्त काम करावे लागला लागणार. या अन्यायाविरुद्ध संपूर्ण राज्यातील आशा व गटप्रवर्तक महिला आजपासून covid-19 संदर्भातील कोणतेही काम करणार नाहीत असे जाहीर करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व सुमन पुजारी, अंजली पाटील, सोनाली सुतार ,अरुणा मांगले, उर्मिला पाटील, सुवर्णा सातपुते ,सुवर्णा पाटील, रेखा चव्हाण ,प्राजक्ता बोरगावे ,विद्या कांबळे ,चांदणी साळुंखे ,सविता साळुंखे ,मनीषा बोरसे ,सारिका शहापुरे इत्यादींनी केले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.