Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोवीड 19 महालसीकरण अभियानांतर्गत ‍जिल्ह्यात पहिल्या दिवशी 45 हजार जणांनी घेतला कोरोना लसीचा डोस

 कोवीड 19 महालसीकरण अभियानांतर्गत ‍जिल्ह्यात पहिल्या दिवशी  45 हजार जणांनी घेतला कोरोना लसीचा डोस 


सांगली, दि. 20,  जिल्ह्यात  सुरू असलेल्या कोवीड 19 महालसीकरण अभियानाच्या पहिल्या दिवशी सकाळी 8 वाजल्यापासून कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले, हे लसीकरण रात्री 8 वाजेपर्यंत सुरू होते. या कालावधीत जिल्ह्यातील 45 हजार नागरिकांनी कोरोना लसीचा डोस घेतला. दि. 22 ऑक्टोबर रोजीही सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत कोरोना महालसीकरण अभियान राबविण्यात येत आहे. तरी 18 वर्षावरील ज्यांनी अद्यापही कोरोना लस  घेतली नाही तसेच ज्यांचा दुसरा डोस प्रलंबित आहे  त्यांनी या अभियानांतर्गत  लसीचा डोस घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.  दोन्ही डोस घेतल्याशिवाय कोरोना पासून सुरक्षितता नाही त्यासाठी सर्व जिल्हा प्रशासन अहोरात्र काम करत असून कोरोनापासून बचाव करून घेण्यासाठी कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.