सोने-चांदी दरात पुन्हा वाढ
नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर : सोने-चांदी दरात आता पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. मागील काही महिन्यांत सोने दरात चढ-उतार होते. त्यामुळे तुम्ही सोनं खरेदीचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सोने-चांदी दरात वाढ होण्याशी शक्यता वर्तवली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंज MCX वर आज डिसेंबर डिलीव्हरी सोने दरात 0.11 टक्क्यांच्या वाढीची नोंद झाली. तर चांदीच्या किंमती 0.55 टक्के वाढीसह ट्रेड करत आहेत. काय आहे सोने-चांदी भाव - सोने दर आज 0.11 टक्के वाढीसह 47,342 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे. तर आज चांदी 0.55 टक्के वाढीसह 63,612 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत आहे. सोने दरात वाढीची शक्यता - जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीपासून डिसेंबरपर्यंत सोन्याचा भाव 57 हजार रुपयांपासून 60 हजार रुपयांपर्यंत पोहचू शकतो.
चांदीमध्येही मोठी वाढ होऊ शकते. दिवाळी किंवा वर्षाच्या अखेरपर्यंत चांदीच्या किंमती 76000 ते 82000 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचू शकतात. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर - सोन्या-चांदीचा दर घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल.
या मेसेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल. अशाप्रकारे तपासा सोन्याची शुद्धता - सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारकडून एक App तयार करण्यात आलं आहे. 'BIS Care app' असं या App चं नाव असून ग्राहक याद्वारे सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या App वर सोन्याची शुद्धताच नाही, तर यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकतात. लायसन्स, रजिस्ट्रेशन, हॉलमार्क नंबर चुकीचा आढळल्यास ग्राहक याची तक्रार करू शकतात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.