द.भा.जैन सभेची विशेष सर्वसाधारण सभा संपन्न..
सांगली : दक्षिण भारत जैन सभेची " विशेष सर्वसाधारण सभा " रविवार, दि.10 ऑक्टोबर 2021 रोजी सभेचे केंद्रिय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, सभेच्या दि.जैन बोर्डिंग, सांगली येथे ऑन / ऑफ लाईन संपन्न झाली.
स्वागत, प्रास्ताविक, प्रोसिडिंग वाचन मुख्य महामंत्री डॉ.अजित ज.पाटील यांनी केले. जमाखर्चाची सविस्तर माहिती खजिनदार संजय शेटे यांनी देऊन सभासदांच्या शंकांचे निरसनही केले. कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याने सभेचे ऐतिहासिक 100 वे अधिवेशन लवकरच घेऊ, असे चेअरमन रावसाहेब जि.पाटील यांनी जाहीर केले. अध्यक्षीय मनोगतात भालचंद्र पाटील यांनी सभेच्या प्रदीर्घ, व्यापक कार्याचा आढावा घेतला. शिवाजी विद्यापीठ भ.महावीर अध्यासन केंद्र, सभेचे शिष्यवृत्ती वितरण, नियोजित जैन सांस्कृतिक भवन, कर्मवीर भाऊराव पाटील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची माहिती देऊन कोरोना काळात सभेने केलेल्या सामाजिक कार्याचे विवेचन केले. जैन बोर्डिंग आणि श्राविकाश्रमच्या नूतन वास्तूंचे उद्घाटन अधिवेशनात करण्यात येईल, असे सांगून देणगीदारांना धन्यवाद दिले. या इमारतींसाठी रु.5 लाखांची देणगी दिलेल्या भूपाल देसाई कुटुंबीय तसेच रु.4 लाखांची देणगी दिलेल्या श्रीमती कुसुम चौधरी कुटुंबीय, आणि इन्कमटँक्सच्या असि.कमिशनरपदी निवड झालेल्या डॉ. श्रीधर लिंबीकाई आणि आठ तास सतत लाठी फिरवून विक्रम / रेकॉर्ड केलेल्या ओंकार हुपरे यांचा सभेच्या वतीने भालचंद्र पाटील, रावसाहेब पाटील, संजय शेटे, भारती चौधरी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आभार प्रदर्शन सहखजिनदार पापा पाटील यांनी केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.