Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कर्मवीर पतसंस्थेने कार्यातून आदर्श निर्माण केला आहे नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर वाठार उर्फ उदगांव शाखेचे उद्घाटन ५० शाखेच्या माध्यमातून कार्यविस्तार.

कर्मवीर पतसंस्थेने कार्यातून आदर्श निर्माण केला आहे नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर वाठार उर्फ उदगांव शाखेचे उद्घाटन ५० शाखेच्या माध्यमातून कार्यविस्तार.


कुंभोज कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सांगली च्या ५० व्या वाठार तर्फ उदगांव शाखेचे उद्घाटन मा. नामदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.

स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी केले. श्री. पाटील यांनी संस्थेच्या सांपत्तिक स्थितीची व कार्याची माहीती दिली. संस्थेचे संपूर्ण कामकाज ऑनलाईन कोअर बँकींग असून संस्थेच्या ठेवी ५५२ कोटी आहेत. संस्थेने रुपये ४३२ कोटीचे कर्ज वाटप केले आहे. संस्थेचे भागभांडवल २३ कोटी असून स्वनिधी ५७ कोटी आहे. संस्थेचे खेळते भांडवल ६४० कोटी आहे. संस्थेचा एकूण व्यवसाय १०० कोटीचा आहे. संस्थेची सभासद संख्या ४२०००) असून संस्थेस सतत ऑडीट वर्ग अ असून नेट एनपीए शुन्य टक्के आहे.

प्रमुख पाहुणे म्हणुन बोलताना नामदार राजेंद्र पाटील म्हणाले की कर्मवीर संस्थेने आपल्या कार्याची वेगळी शैली निर्माण केली असून त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. संस्थेने ग्राहक सेवेसाठी ५० शाखांची आदर्श शृंखला निर्माण करून कर्मवीर आण्णांचे विचार तळागाळात पोहचविण्याचे काम केले आहे. संस्थेने कार्यातून आपला ठसा उमटविला असून संस्थेला सदैव आपले सहकार्य राहील अशी ग्वाही दिली,

या प्रसंगी वाठार च्या सरपंच सौ. रिना प्रविण शिंदे, डेप्युटी सरपंच शंकर शिंदे, जिल्हा परिषद सदस्य श्री. प्रविण पाटील, पंचायत समिती सदस्य श्री राजकुमार भोसले वारणा दुध संघाचे संचालक श्री. चंद्रशेखर बुवा खोची गांवचे सरपंच श्री. जगदिश भिमराव पाटील एकनाथ दुध संस्थेचे चेअरमन श्री. गुणधर बाबुराव हेरले, अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील श्री. राजेश नेमिनाथ मडके, नरंदे गांवचे उपसरपंच श्री. अभिजीत बबन भंडारी.. उदयसिंह मोरे, बाळासो नाना पाटील यांचे सह उध्दवराज नागरी सहकारी पतसंस्था दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्या. श्रीराम पाणी पुरवठा मर्या., बुवाचे वाठार वारणा सहकारी पाणी पुरवठा महादेव पाणी पुरवठा संस्था हिराई शेळी मॅडी पतसंस्था रुक्मीनी महिला पतसंस्था भैरवनाथ विकास सेवा संस्था वाठार तर्फ उदगांव विकास सेवा संस्था वाठार या संस्थांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी नवोदित राष्ट्रीय कराटे खेळाडू क्रिश अतिश मलकेकर यांचा व शाखा सल्लागार श्री. जितेंद्र दादू मडके, अविनाश भाऊसो पाटील भानुदास कृष्णांत गायकवाड, राजकुमार शांतीनाथ 'भोकरे, अभिजीत बबनराव भंडारी यांचा नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे हस्ते सत्कार करणेत आला.

कार्यक्रमास संस्थेच्या व्हाईस चेअरमन श्रीमती भारती चोपडे, संचालक अॅड. एस.पी. मगदूम डॉ. नरेंद्र खाडे, डॉ. रमेश ढबू, श्री. ओ. के. चौगुले, लालासो थोटे, सौ. ललिता सकळे, तज्ञ संचालक डॉ. एस.बी. पाटील (मोटके) संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदूम उपस्थित होते. आभार संचालक श्री. वसंतराव नवले यांनी मानले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.