Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नितेश राणेंचा खोचक टोला; आम्हाला उद्धवजींमध्ये राहुल गांधी स्पष्ट दिसू लागले आहेत"

 नितेश राणेंचा खोचक टोला; आम्हाला उद्धवजींमध्ये राहुल गांधी स्पष्ट दिसू लागले आहेत"


मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची कालपासून जोरदार चर्चा सुरु आहे. याच मेळाव्यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणानंतर आम्हाला आता उद्धवजींमध्ये राहुल गांधी स्पष्ट दिसू लागले आहेत अशी टीका राणे यांनी यावेळी केली आहे.

नितेश राणेंनी यासंदर्भात ट्वीट केले आहे. ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात की, आम्हाला आता उद्धवजींमध्ये राहुल गांधी स्पष्ट दिसू लागले आहेत. दसरा मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात आता काहीच फरक राहीलेला नाहीये, हे मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकतो, कुठलीच शंका नाही.


दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यामधील भाषणात भाजपवर जोरदार हल्ला केला आहे. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्दा निशाणा केला आहे. ठाकरे यांच्या टीकेनंतर भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.