पेट्रोल, डिझेलच्या दरात सलग चौथ्या दिवशी वाढ..
नवी दिल्ली: भारतात सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली. दिल्लीत एक लिटर पेट्रोल १०७ रुपये २४ पैसे तर एक लिटर डिझेल ९५ रुपये ९७ पैसे या दराने उपलब्ध आहे. मुंबईत एक लिटर पेट्रोल ११३ रुपये १२ पैसे तर एक लिटर डिझेल १०४ रुपये या दराने उपलब्ध आहे. कोलकातामध्ये एक लिटर पेट्रोल १०७ रुपये ७८ पैसे तर एक लिटर डिझेल ९९ रुपये ०८ पैसे या दराने उपलब्ध आहे. चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोल १०४ रुपये २२ पैसे तर एक लिटर डिझेल १०० रुपये २५ पैसे या दराने उपलब्ध आहे.
भारत तेलासाठी प्रामुख्याने आयातीवर अवलंबून आहे. यामुळे ज्या देशांमधून तेल खरेदी केले जाते त्या देशांतील तेल कंपन्यांशी चर्चा करुन दर नियंत्रणात राखण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. जगभरात मागणीच्या तुलनेत तेलाचे उत्पादन आणि पुरवठा यांच्यात घट झाली आहे. यामुळे ज्या देशांमध्ये जास्त मागणी आहे त्या सर्व देशांमध्ये तेलाच्या दरांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे.
दररोज सकाळी सहा वाजता जाहीर होतात दर
दररोज सकाळी सहा वाजता एक लिटर पेट्रोल आणि एक लिटर डिझेल यांचे दर तेल कंपन्या जाहीर करतात. पेट्रोल आणि डिझेलवर जीएसटी लागू नाही. डीलरचे कमिशन तसेच केंद्र आणि राज्य सरकारचे कर यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ होते. इंडियन ऑइल कंपनीच्या पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेण्यासाठी RSP असे टाइप करा आणि एक स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाइप करा हा मेसेज 9224992249 वर एसएमएस (SMS) करा. प्रत्येक शहराचे कंपनीने निश्चित केलेले कोड कंपनीच्या वेबसाइटवर मिळतील. याच पद्धतीने बीपीसीएलचे ग्राहक RSP असे टाइप करुन नंतर एक स्पेस देऊन शहराचा कोड टाइप करुन हा मेसेज 9223112222 वर पाठवून पेट्रोल-डिझेलचे ताजे दर जाणून घेऊ शकतात. एचपीसीएलच्या ग्राहकांना HPPrice असे टाइप करुन नंतर एक स्पेस देऊन शहराचा कोड टाइप करुन हा मेसेज 9222201122 वर पाठवावा लागेल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.