Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तब्बल 90 विद्यार्थ्यांसह 101 जणांना करोनाची लागण; सर्व बाधित एकाच शाळेतील

 तब्बल 90 विद्यार्थ्यांसह 101 जणांना करोनाची लागण; सर्व बाधित एकाच शाळेतील


नवी दिल्ली : करोनाची लाट ओसरल्यानंतर शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय आता काही राज्यांना चांगलाच महागात पडणार असल्याचे दिसत आहे. कारण या निर्णयामुळे शालेय विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.कर्नाटकमधील चिकमंगळूरू जिल्ह्यातील तब्बल 90 विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यातील एका शाळेत इतके करोनाबाधित विद्यार्थी आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बाधितांचे नमुने जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.

सीगोडू येथील जवाहर नवोदय शाळेतील 59 विद्यार्थी आणि 10 कर्मचारी अशा एकूण 69 जणांना शनिवारी कोविडची लागण झाली असल्याचे समोर आले. त्यानंतर यामध्ये वाढ होऊन आणखी 21 विद्यार्थी आणि एका कर्मचाऱ्याची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर ही संख्या आता 101 वर पोहोचली आहे.

मोठ्या प्रमाणात कोविड -19 पॉझिटिव्ह प्रकरणे आढळल्यानंतर, जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणाले की, शाळा सील केली जाईल आणि पुढील सात दिवसांसाठी बंद राहणार आहे.

शाळेतून एकूण 457 नमुने गोळा करण्यात आले. त्यापैकी 69 नमुने पहिल्यांदाच पॉझिटिव्ह आले. सोमवारी या आकड्यात वाढ झाली आणि आता शैक्षणिक संस्थेतील 90 विद्यार्थी आणि 11 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

ओमायक्रॉनच्या संसर्गाचा धोका असताना दुसरीकडे कर्नाटकमध्ये करोना बाधित आढळत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. रविवारी, नांजप्पा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्सेसमध्ये 29 विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाली असल्याचे समोर आले. बहुतांशी विद्यार्थ्यांना कोणतीही लक्षणे नसून वसितगृह परिसर सील केला असल्याची माहिती उपायुक्त के.बी. शिवकुमार यांनी दिली.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.