पत्रकारांसोबत महापौरांनीही साधली नेत्रतपासणीची संधी दोन दिवसांत दोनशेहून अधिक पत्रकारांनी घेतला लाभ
पत्रकारांच्या नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन करायला आलेल्या महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी स्वतः ही नेत्रतपासणी ची संधी साधत पत्रकारांना प्रोत्साहन दिले. ख्यातनाम नेत्रतज्ञ दिलीप पटवर्धन यांनी ही तपासणी केली.
मराठी पत्रकार परिषदेच्या 83 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या शिबिराला शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस भरघोस प्रतिसाद लाभला. 200 पेक्षा अधिक पत्रकार आणि कुटुंबीयांनी या शिबिराचा लाभ घेतला. पत्रकारांच्या शिबिराला प्रोत्साहन म्हणून महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी स्वतः नेत्रतपासणी करून घेत सर्व पत्रकारांना ही संधी साधण्याचे आवाहन केले.
सांगली-मिरज-कुपवाड शहरासह आसपासच्या ग्रामीण भागातून दोनशे जणांनी या नेत्रतपासणी शिबिराचा लाभ घेतला. दोन दिवसानंतर ही ज्या पत्रकारांची तपासणी राहिली आहे त्यांच्यासाठी सोमवार नंतर आणखी काही कालावधी मिळतो का यासाठी प्रयत्न सुरू असून इच्छुक पत्रकारांनी सरचिटणीस प्रवीण शिंदे यांच्याकडे नाव नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कोळी यांनी केले आहे.
या शिबिरात अनेक पत्रकारांना सवलतीच्या दरात चष्मे उपलब्ध झाले असून नेत्र शस्त्रक्रियासाठी पत्रकार संघाकडून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत अशी माहितीही कोळी यांनी दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.