Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राष्ट्रवादीने शब्द पाळला, आबांचा मुलगा रोहित पाटील यांच्यावर सांगलीत मोठी जबाबदारी

 राष्ट्रवादीने शब्द पाळला, आबांचा मुलगा रोहित पाटील यांच्यावर सांगलीत मोठी जबाबदारी


सांगली, 15 नोव्हेंबर : राष्ट्रवादीचे  दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर.आर. पाटील  यांचा मुलगा रोहित पाटील  आता राजकीय आखाड्यात वडिलांचा वारसा पुढे नेते आहे.

कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकांमध्ये  रोहित पाटील चांगलेच सक्रिय झाले आहे. 'आता माझं वय 23 आहे, 25 होईपर्यंत काहीच शिल्लक ठेवत नाही, असा इशारा देत रोहित पाटील यांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरले. कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचार शुभारंभ आज रोहित पाटील यांच्या हस्ते पार पडला. रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढत आहेत.

याठिकाणी भाजपा, शिवसेना आणि काँग्रेस यांची शेतकरी विकास आघाडी राष्ट्रवादी विरोधात मैदानात आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने रोहित पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात होत आहे. महाविकास आघाडीत एकत्र असणाऱ्या काँग्रेस आणि शिवसेनेने या ठिकाणी विश्वासात न घेता भाजपाशी आघाडी केल्याने या ठिकाणी ही निवडणूक राष्ट्रवादी विरुद्ध भाजप शिवसेना काँग्रेसच्या शेतकरी विकास आघाडी, अशी होत आहे. यानिमित्ताने रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली कवठेमहांकाळ शहरातून भव्य,अशी प्रचार पदयात्रा काढण्यात आली.

त्यानंतर आयोजित प्रचार सभेमध्ये अनेक नेत्यांनी 25 वर्षाच्या तरुणाला हरवण्यासाठी सर्व विरोधक एकवटले आहेत, असं मत व्यक्त केलं. हा धागा पकडत रोहित पाटील यांनी आपल्या भाषणातून बोलताना म्हणाले की, 'आपण सगळ्यांनी सांगितले 25 वर्षाच्या तरुणाला हरवायला सगळे एकत्र आले आहेत. पण आता माझं वय 23 आहे आणि 25 होईपर्यंत काहीच शिल्लक ठेवत नाही. याची खात्री देता,असा गर्भित इशारा आपल्या विरोधकांना दिला आहे. रोहित पाटील आता निवडणुकीला सामोरं जात आहे. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल काय लागणार याकडे सांगलीकरांचं लक्ष लागलं आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.