वेतन व देयकांचे प्रदान गतीने होण्यासाठी युजर आयडी व पासवर्ड तात्काळ रीसेट करा - जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. सुहासिनी पाटील
सांगली, दि. 14 : एसबीआय फास्ट प्लस प्रणाली अंतर्गत सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर सर्व देयकांचे प्रदान जलद गतीने होण्यासाठी युजर आयडी व पासवर्ड संबंधित कार्यालयांच्या अधिकृत ईमेलवर पाठविण्यात आलेले आहेत. त्यानुसार सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी आपल्या कार्यालयाचा युजर आयडी व पासवर्ड तात्काळ रीसेट करून घ्यावा. याबाबत काही अडचण असल्यास कोषागार कार्यालय सांगली यांच्याशी त्वरीत संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. सुहासिनी पाटील यांनी केले आहे.
भारतीय स्टेट बँकेच्या CMP प्रणालीमध्ये आवश्यक बदल करून आता SBI Fast Plus (New Cmp) प्रणाली ही आधिक कार्यक्षम, वेगवान आणि अचूक अशी नवीन प्रदान प्रणाली बँकेने उपलब्ध करून दिलेली आहे. वरीलप्रमाणे कार्यवाही पूर्ण न केल्यास कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर सर्व देयकांचे प्रदान होणार नाही. याबाबत सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे आवाहनही डॉ. पाटील यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.