थर्टी फर्स्ट होणार जोरात, महाराष्ट्र सरकारने दारूवरील कर केला कमी, व्हिस्की दोन हजार रुपयांनी स्वस्त
मुंबई: आयात केलेल्या दारूवर महाराष्ट्र सरकारने कर कमी केला आहे. हा कर ३०० टक्क्यांहून १५० टक्क्यांवर आणल्याने व्हिस्कीचे दर कमी होणार आहे.
१८ नोव्हेंबर रोजी राज्य सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर १३ डिसेंबरपासून नवे दर लागू होणार आहेत. त्यामुळे व्हिस्की २ हजार रुपयांनी स्वस्त होणार आहे. डिसेंबरमध्येच व्हिस्कीचे दर कमी झाल्याने तळीरामांचा थर्टी फर्स्ट आनंदात जाणार आहे.
दारूवर अधिक कर असल्यामुळे ग्राहक शेजारील राज्यातून दारू विकत घेत होते, त्यामुळे राज्याचा महसूल बुडत होता. त्यामुळे दारूवरील कर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर कमी केल्यामुळे दारूची तस्करी कमी होईल, राज्याचा महसूल बुडणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच यामुळे दारूची चोरीही होणार नाही असे सांगण्यात येत आहे.
१३ डिसेंबर पासून राज्यात दारूसाठी नवे दर लागू होणार आहेत.
Blantyre's Finest Blended Scotch Whiskey -
जुनी किंमत 3075 आणि नवी किंमत 2100
Shivas Regal (12 year old) Blended Scotch Whiskey -
जुनी किंमत 5850 आणि नवी किंमत 3850
Jordans London Dry Jean -
जुनी किंमत 2400 आणि नवी किंमत 1650
Johnny Walker Red Label Blended Scotch Whiskey -
जुनी किंमत 3060 आणि नवी किंमत 1950
J&B Rare Blended Scotch Whiskey -
जुनी किंमत 3060 आणि नवी किंमत 2100
Jameson Triple Distilled Irish whiskey
जुनी किंमत 3800 आणि नवी किंमत 2500
Johnny Walker Black Label Blended Scotch Whiskey -
जुनी किंमत 5760 आणि नवी किंमत 3750
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.