ओमिक्रॉनबाधितांच्या तब्येतीबाबत आरोग्यमंत्र्यांनी दिली 'ही' माहिती
मुंबई : दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरातील देशाची चिंता वाढली. वेगाने पसरत असलेल्या कोरोनाच्या या ओमिक्रॉन व्हेरिएंटने भारतासह महाराष्ट्रातही शिरकाव केला. डोंबिवली पाठोपाठ पुण्यातही ओमिक्रॉनचे रूग्ण आढळल्याने भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्याने धाकधूक वाढली आहे. डोंबिवलीत 1 तर पुण्यात तब्बल 7 ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रूग्ण आढळून आले आहेत. तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील या ओमिक्रॉनबाधित रूग्णांच्या तब्येतीबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
'सर्व ओमिक्रॉन पॉझिटिव्ह रूग्णांची प्रकृती सध्या ठीक आहे. यापैकी काही रूग्णांमध्ये सौम्य स्वरूपाची लक्षणं आढळली आहेत. तर यातील 3 रूग्णांमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणं आढळून आली नाहीत', अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
दरम्यान, डोंबिवली नंतर पुण्यात ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्यानंतर राज्यातील ओमिक्रॉन पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या आता 8वर जाऊन पोहोचली आहे. पुण्यात एकाच कुटुंबातील 6 जणांना ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.