सांगलीतल्या 'या' म्हशीची देशभर चर्चा
सांगली : सध्या सांगलीमध्ये एका रेड्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. जिल्ह्यातील तासगाव येथे भरविण्यात आलेल्या प्रदर्शनीमध्ये हा रेडा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. कारण, या रेड्याचं वजन १.५ टन असून त्याची किंमत ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. या रेड्याचे नाव गजेंद्र असून त्याची किंमत तब्बल ८० लाख रुपये आहे.सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून १६ डिसेंबर ते २० डिसेंबरपर्यंत प्रदर्शन भरविण्यात आले आहे. महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवरील मंगसुळी गावातील शेतकरी विलास नाईक यांच्याकडील हा गजेंद्र नावाचा रेडा आहे. गजेंद्रचा दररोजचा खुराक म्हणजे त्याला दिवसाला 15 लिटर दूध, बक्कळ ऊस, गवत आणि इतर खाद्य लागते. नाईक यांच्या घरच्या गीर म्हशींचा हा रेडा आहे.
या रेड्याला पाहण्यासाठी हजारो किलोमीटरवरून लोक येत आहेत. तर, या गजेंद्र ला तब्बल 80 लाखाला मागणी सुद्धा आली होती. पण, मालकांनी घरची पैदास असल्याने गजेंद्रला विकले नाही. आतापर्यंत गजेंद्रला कर्नाटकसह चार प्रदर्शनात मालकाने नेले होते आणि आज सांगलीच्या तासगाव येथे शिवार प्रदर्शनात तो आला आहे आणि खास आकर्षण बनला आहे.
हा रेडा आमच्या शेतीची शान बनला आहे. अशा रेड्यांना वाढविण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. मात्र, त्यापासून तयार होणारे जीव हे चांगल्या दर्जाचे असतात. या शेतकऱ्याकडून प्रेरणा घेऊन आमच्या जिल्ह्यातील इतर शेतकरी जनावरांचे निरोगी संगोपन करतील. त्यामुळे त्यांना चांगलं उत्पादन देखील मिळेल. आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी असा विचार करून पशुसंवर्धन करणे गरजेचे झाले आहे, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.