Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुलाने केला जन्मदात्या बापाचा खून, कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील घटना

 मुलाने केला जन्मदात्या बापाचा खून, कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील घटना

देवाळे : पन्हाळा तालुक्यातील माले येथे मुलानेच आपल्या जन्मदात्या बापाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचे संशयातून मुलाकडून वडीलांच्या डोक्यात लोखंडी फावड्याचा वर्मी घाव घातला.

यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. भिकाजी शंकर वगरे (वय ४७ ) असे या खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना काल, गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मयत भिकाजी वगरे यांचे गावातील महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून त्यांच्याशी त्यांची पत्नी व मुलगा यांचा वारंवार वाद होत होता. गुरुवारी सायंकाळी याच कारणावरून त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यावेळी मयत भिकाजी याने पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी मुलगा अजित याने आईला कशाला मारहाण करता असे विचारल्याने अजित व भिकाजी यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला.


हा वाद विकोपाला गेल्याने मुलगा अजित याने रागाच्या भरात वडील भिकाजी यांच्या डोक्यात लोखंडी फावड्या मारला. यात भिकाजी गंभीर जखमी झाले. त्यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मुलानेच आपल्या जन्मदात्या वडिलांचा खून करून तो रात्रीच पसार झाला होता. या घटनेची माहिती कोडोली पोलिसांना मिळताच पोलिसांनी संशयित आरोपी अजित वगरे याचा रात्रभर शोध घेऊन पहाटे त्यास अटक केली. या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड करीत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.