जी.डी.सी.ॲण्ड ए. व सी.एच.एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 20 मार्च पर्यंत - जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे
सांगली दि. 14 : शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ (जी.डी.सी. ॲण्ड ए बोर्ड) कडून घेण्यात येणारी शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी.ॲण्ड ए) परिक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम) परिक्षा सांगली केंद्रावर दि. 27, 28 व 29 मे 2022 रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि. 10 फेब्रुवारी 2022 पासून दि. 20 मार्च 2022 पर्यंत देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांनी दिली.
या परीक्षेसाठी ऑनलाईन ॲप्लीकेशन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. ऑनलाईन अर्ज https://gdca.maharashtra.gov.in या संकेत स्थळावरच भरता येईल. या परिक्षेस नव्याने बसू इच्छिणाऱ्या तसेच पुर्वी परिक्षेस बसलेल्या परंतु अनुत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींना बसता येईल. अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सांगली, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विजयनगर सांगली दूरध्वनी क्रमांक 0233-2600300 येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.