शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास 28 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ
सांगली दि. 10 : राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलमध्ये राबविण्यात येणाऱ्या 14 शिष्यवृत्ती योजनांचा समावेश आहे. त्याअनुषंगाने शिष्यवृत्ती योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सन 2021-22 करीता महाडीबीटी पोर्टलवर विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी राज्य शासनाकडून दि. 28 फेब्रुवारी 2022 अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी www.mahadbtmahait.gov.in या वेबलिंकवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अशी माहिती कोल्हापूर विभागाचे विभागीय सहसंचालक (उच्च शिक्षण) यांनी दिली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.