ना.जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गठीत झालेल्या समिती ची 7 वी बैठक या समितीच्या अध्यक्षा ज्योती आदाटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
ना.जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गठीत झालेल्या समिती ची 7 वी बैठक या समितीच्या अध्यक्षा ज्योती आदाटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आजच्या बैठकीचा आढावा देताना ज्योती आदाटे म्हणाल्या की आजच्या बैठकीत 220 प्रस्तावावर सांगोपांग चर्चा झाली या चर्चेत 149 प्रस्ताव मंजूर करण्यात आले आणि 71 प्रस्ताव अपात्र निघाल्याने नामंजूर करण्यात आले तसेच दरवर्षी शासनाकडून अपात्र शोध मोहीम घेतली जाते या मोहिमेत 102 अपात्र लाभार्थ्यी आढळुन आल्याने ते निकाली काढण्यात आले आहे तसेच समिती स्थापन होऊन 16 महिने झाले.
आजअखेर 892 प्रस्ताव दाखल झाले यापैकी 188 प्रस्ताव अपात्र असल्याने निकाली काढण्यात आले जवळ पास 691 लाभार्थ्यांना न्याय देऊ शकलो यामध्ये विधवा परित्यक्ता घटस्फोटीता प्रौढ कुमारिका वृध्दनिराधार दिव्यांग तसेच अगदी कोरोनाच्या काळात सुध्दा विधवा महिलांना आणि निराधार वृद्धांना न्याय देता आला या कोरोनाच्या महामारीच्या काळात सुध्दा आमची समिती व प्रशासन आम्ही भागाभागात जाऊन जिवाची पर्वा न करता मेळावे प्रशिक्षण शिबीर घेऊन जास्तीत जास्त लाभार्थ्यांना प्रक्षिशित करण्याचा प्रयत्न करतोय.
लाभार्थ्यांनी प्रस्ताव स्वतः समजुन घेऊन पुर्ण करावा दलालाकडुन प्रस्ताव पुर्ण करणे म्हणजे आपली स्वतःची आर्थिक मानसिक पिळवणूक करुन घेतल्यासारखे आहे तरी सर्वांनी स्वतः निर्भयपणे प्रस्ताव दाखल करावेत यासाठी आमच्या समितीचे व प्रशासनाचे पुर्ण सहकार्य आणि मार्गदर्शन मिळेल तरी या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आजच्या या बैठकीत आशाताई पाटील अनिता ताई निकम बिपीन कदम आप्पासाहेब ढोले संतोष भोसले नितीन काळे तसेच तहसीलदार के व्ही घाडगे साहेब तलाठी एम आय मुलाणी मॅडम एस आय खतिब साहेब लिपिक सचिन गुरव आणि सहायक प्रियांका तुपलोंडे इ उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.