Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडीकल कॉलेज ADVIK-2022 पारीतोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

गुलाबराव  पाटील होमिओपॅथिक मेडीकल कॉलेज ADVIK-2022 पारीतोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न 



मराठी सिनेअभिनेते नितिश चव्हाण, मानसी भवाळकर, विराट मडके दिग्दर्शक मकरंद माने यांची प्रमुख उपस्थिती 

मिरज : गुलाबराव पाटील होओिपॅथिक मेडीकल कॉलेजचे ADVIK-2022 स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ जलौषी वातावरणात पार पडला. कार्यक्रमासाठी  लागीर झालं जी फेम मराठी सिनेअभिनेते नितिश चव्हाण, तसेच अभिनेत्री मानसी भवाळकर, विराट मडके, दिग्दर्शक मकरंद माने हे प्रमुख पाहुणे म्हणुन तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक-चेअरमन पृथ्वीराज पाटील उपस्थित होते. यावेळी सोयरीक या मराठी चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये BHMS  च्या  MUHS विद्यापीठात सुवर्णपदक मिळविलेल्या विद्यार्थीनी श्रेया लाड, श्रुती कुलकर्णी, मुस्कान शेख, तसेच अॅनाटॉमी विषयात प्रथम मुस्कान शेख, मटेरिया मेडीका विषयात प्रथम श्रुती कुलकर्णी, ऑरगॅनन मेडीसन मध्ये प्रथम श्रेया लाड व श्रुती कुलकर्णी, या विद्यार्थीनींचा व संबंधित विषयाचे प्राध्यापक डॉ. राजेंद्र मेथे, डॉ. राजीव जोशी, प्रा. डॉ. जिनेश्वर यालिगौडा, डॉ. सचिन वनमारे, डॉ. सुहास पाटील व डॉ. वैशाली सांवत यांचाही प्रमाणपत्र व शिल्ड देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करणेत आला. त्याचबरोबर महाविद्यालयातील बेस्ट इंटर्न स्टुडंट, म्हणुन अनमोल मोरे, अमोल मांडोळकर, स्नेहल पाटील यांचा व बेस्ट स्टुडंट म्हणुन शुभदा गुरव, मुस्कान शेख सर्वोत्तम NSS स्वयंसेवक म्हणुन शुभम जाधव, शुभम रहाणे, अनुप सुर्यवंशी, सोमनाथ सलगर या विद्यार्थ्याना गौरविण्यात आले. त्याचबरोबर इतर शैक्षणिक व क्रिडा स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यानाही पाहुण्यांच्या हस्ते गौरविणेत आले. 

कार्यक्रमाचे सुत्रासंचलन अॅड. पुजा शिंगाडे व डॉ. जिनेश्वर यालिगौडा यांनी केले, या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन पृथ्वीराज पाटील यांचेसह प्रशासन समन्वयक सतीश पाटील, प्राचार्य डॉ. राजेद्र मेथे, यांचेसह संकुलातील सर्व विभागाचे प्राचार्य, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.