सांगली महापालिकेत श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन यांची जयंती साजरी
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत श्रीमंत चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त मनपा मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात श्रीमंत चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मुख्य लेखाधिकारी सुशीलकुमार केम्बळे, प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापुरे, रेकॉर्ड किपर कमलाकर कुलकर्णी , लेखा विभागाचे संगय्या मठद, अरुण माळी, प्रकाश भोसले, प्रशासकीय विभागाचे मंगल फोंडे, वैशाली सुर्यवंशी, भारती माळी, प्रसाद जामसंडेकर, प्रसाद यादव आदीसह मनपा कर्मचारी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.