वेतनेतर अनुदानाबाबत मुख्यमंत्र्यांशी तातडीने बोलणार ना. डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर
सांगली दि. २८ : कोरोना काळात राज्यातील शाळा आर्थिक अडचणीत आल्या आहेत. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा खर्च करताना शाळांना कर्जे काढून तरतूद करावी लागत आहे.शिवाय दैनंदिन शालेय खर्चासाठी निधी नाही. गेली तीन वर्षे वेतनेतर अनुदान थकीत असल्याने शाळा व्यवस्थापन मेटाकुटीला आले आहे. राज्यातील सर्व शाळांना थकीत वेतनेतर अनुदान तातडीने वितरित करावे..तसेच यापुढे नियमित वेतनेतर अनुदान वितरीत करावे.. आणि हे शिक्षण संस्थाचालकांचे गार्हाणे मा. मुख्यमंत्री व मा. अर्थमंत्री यांच्यासमोर मांडून संस्थांना दिलासा द्यावा अशी निवेदनाद्वारे मागणी आज राज्याचे आरोग्य राज्यमंत्री ना. डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे महामंडळाचे खजिनदार रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी केली.
यावेळी ना. यड्रावकर म्हणाले, 'शिक्षण संस्थाना वेतनेतर अनुदान नसल्याने शाळा चालवताना अनेक अडचणी येतात याची मला कल्पना आहे. या कामी मा. मुख्य मंत्री व मा. अर्थमंत्री यांची भेट घेऊन शाळांचे थकीत वेतनेतर अनुदानासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देणेबाबत मागणी करणार असल्याचे सांगितले. लवकरच हा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी वेतनेतर अनुदान हे सातव्या वेतन आयोगानुसार चालू असलेल्या वेतनावर आधारित सरसकट १२% देण्याचा शासन निर्णय होण्यासाठी लक्ष घालावे अशीही मागणी ना. यड्रावकर यांच्याकडे करण्यात आली. सेवाभावी वृत्तीने बहुजन समाज शिक्षण कार्य करणाऱ्या संस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी कटीबध्द असल्याचे ना. यड्रावकर म्हणाले.
यावेळी सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे सहसचिव प्रा. एन. डी. बिरनाळे व मुख्य प्रवक्ता मा. विनोद पाटोळे उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.