पेट्रोल पोहचले ३३८ रुपयांवर...
मुंबई : जागतिक कच्च्या तेलात आणि भारतीय क्रूड बास्केटच्या किमतींमध्ये वाढ होत राहिल्यास किरकोळ विक्रेत्यांना तेलाच्या किमती वाढवण्यास भाग पाडले जाईल. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ग्राहकांना दिलासा देण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन राज्यांना केल्याचे गेल्या आठवड्यातील अहवालातून समोर आले आहे.दरम्यान, श्रीलंकेतील पेट्रोलियम कंपनी सिलोन पेट्रोलियम कॉर्पोरेशनने (CPC) पेट्रोलच्या दरात वाढ केल्याने नागरिकांवर महागाईचा बोजा वाढला आहे. याआधी इंडियन ऑइलच्या स्थानिक कर्मचाऱ्यांनी ऑपरेटिंग किमतीत वाढ करण्याची घोषणा केली होती.
विशेष म्हणजे, सध्या श्रीलंकेला गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, CPC ने 92 ऑक्टेन पेट्रोलची किंमत 84 रुपयांनी वाढवून 338 रुपये प्रति लीटर केली आहे. ही किंमत आता श्रीलंकन इंडियन ऑइल कंपनी (LIOC) च्या प्रति लिटर किमतीएवढी झाली आहे. CPC ने एका महिन्यात दोनदा पेट्रोलच्या किमतीत वाढ केली आहे. या वाढलेल्या तेलाच्या किमतींमुळे आज आंदोलकांनी रस्त्यावर उतरून सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. कंपनीच्या निषेधार्थ लोकांनी तेथे टायर जाळले आणि राजधानीकडे जाणारे प्रमुख रस्ते अडवले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
