सदावर्तेंना सातारा पोलिसांनी उचलले..
'सिल्व्हर ओक' हल्ला प्रकरणातील आरोपी ऍड. गुणरत्न सदावर्ते यांचा आज सातारा पोलिसांनी ताबा घेतला. सदावर्तेंना घेऊन पोलीस दुपारी साताऱयात दाखल झाले असून उद्या शुक्रवारी त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
ऑक्टोबर 2020 मध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला होता. छत्रपती उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी तो गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सातारा पोलीस सदावर्तेंना आज साताऱयाला घेऊन गेले. 'सिल्व्हर ओक' हल्ला प्रकरणात आरोपी असलेल्या सदावर्ते यांना गिरगाव कोर्टाने बुधवारी न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर गिरगाव पोलिसांनी संध्याकाळी सदावर्तेंना आर्थर रोड कारागृहात ठेवले. आज सकाळी सातारा पोलिसांनी कारागृहातून सदावर्तेंचा ताबा घेऊन त्यांना घेऊन गेले. शुक्रवारी सदावर्तेंना कोर्टात हजर करू, असे सातारा पोलिसांनी सांगितले.
संदीप गोडबोले याला दोन दिवसांची पोलीस कोठडी
सिल्व्हर ओक हल्लाप्रकरणी गावदेवी पोलिसांनी संदीप गोडबोले या एसटीतील बडतर्फ कर्मचाऱयाला बुधवारी अटक केली. त्याला आज कोर्टात हजर केले असता त्याला 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. गोडबोले हा कोणाकोणाच्या संपर्कात होता याचा पोलीस तपास करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
