'फ्लॅट विकताना सोसायटीच्या NOC ची गरज नाही', जितेंद्र आव्हाडांची मोठी घोषणा
ठाणे, 12 एप्रिल : 'घर मालकाला स्वतःचा घराचा हक्क आहे. ते घर कोणाला विकावे हा त्याचा निर्णय आहे. जर एखाद्या घरमालकाला घर विकायचा असेल तर त्याकरिता सोसायटीची परवानगी कशासाठी?
घर मालक आणि खरेदीदार यांच्यात सौदा झाला तर परवानगीची काहीच गरज नाही, अशी महत्त्वाची घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. ठाण्यात पत्रकारांशी बोलत असताना जितेंद्र आव्हाड यांनी वेगवेगळ्या मुद्यांवर आणि राजकीय घडामोडींवर भाष्य केलं आहे. तसंच फ्लॅट विक्रीसाठी सोसायटीची परवानगी लागत होती, पण आता जितेंद्र आव्हाड यांनी ही प्रथा मोडीत काढली आहे.'घर मालकाला स्वतःचा घराचा हक्क आहे की ते घर कोणाला विकावे, एखाद्या घरमालकाला घर विकायचा असेल तर त्याकरिता सोसायटीची परवानगी कशासाठी घर मालक आणि खरेदीदार यांच्यात सौदा झाला तर परवानगीची काहीच गरज नाही.
काही ठिकाणी जातीनिहाय घरे विकली जातात गुजराती गुजराती यांना जैन जैन यांना तर शाकाहारी शाकाहारी यांनाच विकतात. यामुळे महाराष्ट्र हा वेगवेगळ्या विभागांत विभागला जात आहे मुंबई ही एकत्र राहिले पाहिजे यासाठी हा प्रयत्न आहे' असं आव्हाड म्हणाले. तसंच, 'एखाद्या घरमालकाने त्याची थकबाकी बाकी नाही, हे एनओसी पत्र काढून घ्यावs, सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस तपास करतात, असंही जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तर मुंब्रा-कळवा येथे मोठ्या प्रमाणात खार जमीन आहे या जमिनीच्या संरक्षणासाठी वारंवार एमआयडीसीला पत्र दिले व याचा पाठपुरावा केला आहे.
या जमिनीला संरक्षित करण्यासाठी देखील अनेक वेळा संबंधित खात्याला सांगितले आहे. परंतु कोणाला त्याचं गांभीर्य नाही या जमिनीचा विकास करण्याचा दूरच राहिला या जमिनीवर निवडणुकीची कार्यालय आणि तलाठी यांची कार्यालय बांधण्याची इच्छा काही लोकांना आहे' असा टोला यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांना लगावला. 'रामनवमीनिमित्त महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दंगे झाले यावर महात्मा गांधी जोपर्यंत रामाला जोडले होते तोपर्यंत ते तत्वज्ञान होता. परंतु राम हे आता सत्ता मिळवण्याचे साधन झाला आहे सत्ता मिळवण्यासाठी आता धर्माचा वापर केला जात आहे. त्यामुळे इतर देशात जे झालं तेच या देशात देखील होईल याचा परिणाम देशातील विविध घटकांमध्ये होईल', अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
