Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त


भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त जयभीम व्यायाम मंडळाच्या वतीने बाबासाहेब आंबेडकर नगर मध्ये ना.जयंत पाटील साहेबांच्या संकल्पनेतून तसेच मा संजय बजाज आणि राहुल दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत संजय गांधी निराधार योजनेचा भव्य मेळावा पार पडला यावेळी या समितीच्या अध्यक्षा ज्योती आदाटे यांनी समस्त महिलांच्या अडचणी जाणून घेतल्या.

योजनेबाबत मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की प्रत्येक वंचित घटकातील लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा कागदपत्रांचा बाऊ करु नये आणि स्वतः प्रस्ताव तयार करण्याचा प्रयत्न करावा कोणत्याही दलालांकडून हे प्रस्ताव करून घेऊ नये विनाकारण आपली आर्थिक पिळवणूक होईल यासाठी या भागातील झुंजार कार्यकर्ते आदर्श कांबळे आणि त्यांची टीम या कामासाठी तत्पर असल्याचे सांगितले या योजना कोणकोणत्या घटकांसाठी आहे आणि कागदपत्रे काय लागतात ते सविस्तर सांगितले यावेळी या मेळाव्याचे आयोजक आदर्श कांबळे म्हणाले की समितीवर ज्योती ताई अध्यक्षा झाल्यापासून या समितीला नवचैतन्य आले आहे.

 एक ना अनेक घटकांना ही पेन्शन योजना मिळते हे आम्हाला ज्योती ताई कडुनच कळाले त्यांनी अनेक भागात असे मेळावे घेऊन वंचिताना प्रशिक्षण दिले आहे तसेच जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत ही योजना पोहोचवण्याचे कार्य अविरतपणे करीत आहेत या मेळाव्याचे आभार सावित्री कांबळे यांनी मांडले या मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या सरचिटणीस प्रियांका तुपलोंडे लिना यादव आदित्य कांबळे अभिजीत वाघमारे विराज कांबळे सिध्दार्थ वाघमारे रोहन खाडे इ कार्यकर्ते आणि असंख्य महिला नागरीक उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.