Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आंबा महोत्सवाचे वसंतदादा मार्केट यार्ड येथे १३ ते 17 मे २०२२ अखेर आयोजन - जिल्हा उपनिंबधक निळकंठ करे

आंबा महोत्सवाचे वसंतदादा मार्केट यार्ड येथे १३ ते 17 मे २०२२ अखेर आयोजन  - जिल्हा उपनिंबधक निळकंठ करे



सांगली दि. 13  : जिल्हा उपनिंबधंक सहकरी संस्था सांगली उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूर,व सांगली कृषि उत्पन्न बाजार समिती, सांगली यांच्या सयुंक्त विदयमाने आंबा महोत्सवाचे आयोजन पदमभूषण डॉ.वसंतदादा पाटील स्मृतिभवन वसंतदादा मार्केट यार्ड सांगली येथे करण्यात आले असून हा आंबा महोत्सव दिनांक १३ ते 17 मे २०२२ अखेर (पाच दिवस ) सकाळी ९ ते रात्री ८ वाजे पर्यत ग्राहकांसाठी चालू राहणार आहे. या आंबा महोत्सव मध्ये प्रामुख्याने हापूस ,केशर ,पायरी व बिटका आंबा या जातीचा आंबा वाजवी दरात ग्राहकांना उपलब्ध्‍ आहे. या महोत्सवाचे उदघाटन जिल्हा उपनिंबधक सहकारी संस्था निळकंठ करे यांनी केले.

या कार्यक्रमास  जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार वेताळ, पोलिस उपअधिक्षक अशोक वीरकर, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूरचे उपसरव्यवस्थापक डॉ.सुभाष घुले,अथणी शुगरचे संचालक डॉ.वंसतराव जुगळे , सहाय्यक निबंधक सहकारी संस्था उर्मिला राजमाने, ,बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण ,पुंडलिक गडदे , प्रसाद भुजबळ, व प्रतिक गोनुगडे व बाजार समितीचे आधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते .

यावेळी निळकंठ करे म्हणाले, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ राबवित असलेल्या उत्पादक ते ग्राहक या थेट विक्री या योजनेचे कौतूक करून हापूस आंबा ग्रामीण भागापर्यत या माध्यमातून पोहचला पहिजे असे सागितले.

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकूमार वेताळ यांनी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ राबवित असलेल्या आंबा महोत्सव हा उपक्रम स्तुतीय योग असून कोकणातील आंबा उत्पादक शेतक-यांनी आशा आंबा महोत्सवा मध्ये मोठया प्रमाणात सहभागी होवून त्यांचा फायदा घ्यावा, तसेच सांगली शहरातील ग्राहकांनी या आंबा महोत्सवास प्रचड प्रतिसाद दयावा असे आवाहन केले.

या कार्यक्रमाच्या उदघाटना प्रसंगी डॉ.सुभाष धुले यांनी आंबा उत्पादकांनी क्यू आर कोड सारख्या आधुनिक तंत्र ज्ञानाचा वापर करणे गरजेचे असलेचे मत व्यक्त केले तसेच  डॉ.जुगळे यांनी कोकणातील शेतक-यांचे आर्थिक चक्र हे आंबा या पिकावर अवलंबून असल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी अशा आंबा महोत्सवास मोठया प्रमाणात सहभागी होणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले. शेवटी कार्यक्रमाचे आभार बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी मानले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.