Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आयपीएलचा गेम खेळून बिहारचे रमेश रातोरात झाले कोट्याधीश, 59 रुपये गुंतवून जिंकले 2 कोटी..

 आयपीएलचा गेम खेळून बिहारचे रमेश रातोरात झाले कोट्याधीश, 59 रुपये गुंतवून जिंकले 2 कोटी..


ड्रीम 11 चे विजेते रमेश कुमार यांनी सांगितले की, तो पश्चिम बंगालमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करतो. "एक दिवस आयपीएलचे सामने पाहत असताना, मी Drim11 अॅप डाउनलोड केले. माझ्या फावल्या वेळेत ड्रीम11 खेळायला सुरुवात केली. सुरुवातीला 49 रुपये लावले. अलीकडेच पंजाब आणि लखनौ यांच्यात झालेल्या सामन्यात मी पंजाबचा संघ निवडला होता.

सरण- आयपीएलमध्ये खेळणारे क्रीडापटू कोट्याधीश होतात, यात नवल नाही. पण, आयपीएलवर ड्रीम 11 गेम  खेळणारे पश्चिम बंगालमधील चालक रमेश कुमार कोट्याधीश झाले आहेत. बिहारच्या सारण जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या रमेश यांनी मोबाईल गेम अॅप ड्रीम११ च्या माध्यमातून आयपीएल टीम तयार केली. ही टीम विजेता ठरली आहे. त्यानंतर रमेश यांनी दोन कोटींची रक्कम जिंकली. कोट्याधीश झालेले रमेश कुमार हे सारण जिल्ह्यातील अमनौर ब्लॉकमधील रसूलपूर गावातील रहिवाशी आहेत. त्यांच्या घरात जल्लोषाचे वातावरण आहे.

रमेश कुमार यांनी ड्रीम11 मध्ये 2 कोटी जिंकले- ड्रीम 11 चे विजेते रमेश कुमार यांनी सांगितले की, पश्चिम बंगालमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत आहे. एके दिवशी आयपीएलचे सामने पाहत असताना, Dream 11 अॅप डाउनलोड केले. फावल्या वेळेत ड्रीम11 खेळायला सुरुवात केली. सुरुवातीला 49 रुपये गुंतविले. अलीकडेच पंजाब आणि लखनौ यांच्यात झालेल्या सामन्यात मी पंजाबचा संघ निवडला होता. यामध्ये वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाची कर्णधारपदी आणि उपकर्णधार शिखर धवनची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली. तसेच ड्रीम 11 टीम तयार करण्यात आली.

59 रुपये टाकून 2 कोटी जिंकले- रमेश कुमार यांनी सांगितले की त्यांनी 11 खेळाडू निवडले. ड्रीम11 मध्ये 59 रुपये गुंतवले. या सामन्यात कागिसो रबाडाने तीन बळी घेतले. इतर निवडलेल्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. सामना संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना संदेश मिळाला की ते पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांनी दोन कोटी रुपये जिंकले आहेत. जीएसटी कापून त्यांच्या खात्यात एक कोटी ४० लाख रुपये आले आहेत. हे पाहून त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.

पैसा मुलांचे संगोपन व समाजातील चांगल्या कामाकरिता खर्च करणार- रमेश कुमार यांचे वडील रोजंदारी करतात. दोन कोटींची रक्कम मिळाल्याने रमेश कुमार यांचे कुटुंबांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आपण एका रात्रीत कोट्याधीश झालो आहोत, यावर त्यांचा अजूनही विश्वास बसत नाही. जिंकलेला पैसा गरीब मुलांच्या संगोपनासाठी आणि समाजाच्या चांगल्या कामांसाठी खर्च करणार असल्याचे रमेश यांनी सांगितले. सध्या रमेश कुमार यांच्या घरात उत्सवाचे वातावरण आहे. लोक त्यांचे खूप अभिनंदन करत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.