Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्र दिनाला राष्ट्रगीत गाण्यासाठी आलेल्या मनपा शाळांतील मुलामुलींची इच्छा आणि मनपा आयुक्तांकडून स्वप्नपूर्ती!

महाराष्ट्र दिनाला राष्ट्रगीत गाण्यासाठी आलेल्या मनपा शाळांतील मुलामुलींची इच्छा आणि मनपा आयुक्तांकडून स्वप्नपूर्ती! मनपा शाळांच्या 50 विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण सुरू लायड इन्स्टिट्यूटचा पुढाकार


सांगली : महाराष्ट्र दिनाला राष्ट्रगीत गाण्यासाठी आलेल्या सांगली मनपा शाळांतील मुलामुलींची संगणक शिकण्याची व्यक्त केलेली इच्छेची मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडून स्वप्नपूर्ती करण्यात येत आहे. मनपा कन्नड शाळेच्या 50 विद्यार्थ्यांना आजपासून मोफत संगणक शिक्षण देण्यास सुरवात झाली आहे.

दि. १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा करतांना ध्वजारोहणाच्या ठिकाणी राष्ट्रगीत गाण्यासाठी आलेल्या मनपाच्या कन्नड शाळेतील मुलामुलींशी गप्पा मारतांना मनपा आयुक्तांनी तुम्हाला शालेय शिक्षणाबरोबर काय शिकायला आवडेल असा प्रश्न केला. कंम्प्युटर असं एकसुरात आणि जोरदार उत्तर पलीकडून लगेच ऐकायला मिळालं. ठिक आहे आम्ही तुम्हाला पुढच्या वर्षापासून नक्की शिकवतो असं मी त्यांना आश्वासित केलं.मात्र आम्ही आता मनपा शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेणार आहोत पण आम्हाला सुट्टया असल्या तरी आम्ही येणारच आणि काँप्युटर शिकणारच असा हट्ट सर्व लहानग्यांनी धरला. 

सांगली येथील प्रसिध्द लियाड इन्स्टीट्यूटचे संचालक  साहील शाह यांना विद्यार्थ्यांची ही इच्छा बोलून दाखवताच त्यांनी मनपाच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण द्यायला तयार आहे असं एका क्षणात सांगितलं! आणि आज प्रत्यक्ष ५० विद्यार्थ्यांचा संगणक शिकण्याचा आणि स्वप्नपूर्तीचा पहिला दिवस उजाडला आहे. कम्प्युटर पाहून विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.  वर्षभर मनपा विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देण्यासाठी पुढे आलेल्या साहील शाह यांचे या योगदानासाठी मनपा आयुक्त कापडणीस यांनी विशेष आभार मानले आहेत. तर सामाजिक हेतूने आणि आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सेवाभावी उपक्रमांना हातभार म्हणून हे काम स्वीकारल्याची प्रतिक्रिया साहिल शहा यांनी दिली आहे.  

महापालिका शाळांची पटसंख्या वाढण्यासाठी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी अपार प्रयत्न सुरू केले आहेत. यातच गप्पांच्या ओघातून चिमुकल्यांनी केलेल्या मागणीची त्यांच्याकडून स्वप्नपूर्ती झाली आणि मनपाचा विद्यार्थीही संगणक साक्षर बनण्यास सज्ज झाला आहे. आज या शुभारंभवेळी मनपाचे शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी पोपट मलगुंडे, लेखाधिकारी गजानन बुचडे, समनवयक सतीश कांबळे , लायडचे प्रमुख साहिल शहा आदी उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.