सांगली प्रमाणे कुपवाड मिरजेतही चिल्ड्रन पार्क होणार...
सांगली प्रमाणे कुपवाड मिरजेतही चिल्ड्रन पार्क होणार : महिला बालकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही , कोव्हिडंमध्ये अनाथ झालेल्या बालकांना उदरनिर्वाह भत्ता, बचत गटासाठी उद्योग केंद्र तर तिन्ही शहरात होणार महिलांसाठी टॉयलेट्स आयुक्त नितीन कापडणीस आणि महिला बालकल्याण समिती सदस्य बैठकीत निर्णय
सांगली: सांगली प्रमाणे कुपवाड मिरजेतही चिल्ड्रन पार्क उभारला जाणार आहे तर महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांना सीसीटीव्ही यंत्रणा पुरवण्याबरोबर कोव्हिडंमध्ये अनाथ झालेल्या बालकांना उदरनिर्वाह भत्ता सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आयुक्त नितीन कापडणीस आणि महिला बालकल्याण समिती सदस्य बैठकीत घेण्यात आला.समिती सभापती गीतांजली ढोपे पाटील आणि समिती अधिकारी चंद्रकांत आडके हे या बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीत महिला बालकल्याण समिती सभापती गीतांजली ढोपे पाटील आणि अन्य सदस्यांनी आपले प्रश्न उपस्थित केले. यावर निर्णय घेताना आयुक्त कापडणीस यांनीं मनपाक्षेत्रातील बचत गटासाठी उद्योग केंद्र तर तिन्ही शहरात महिलांसाठी टॉयलेट्स उभारण्याचा निर्णय घेतला. याचबरोबर मनपा शाळांमध्ये पाण्याची सोय केली जाणार असून मुलांना शाळांमध्ये शालेय साहित्य आणि खेळणीही पुरवली जाणार आहेत.
मनपाच्या बालवाडीसाठी शैक्षणिक साहित्याचे 70 किट आणि खेळणी दिली जाणार आहेत. याचबरोबर महापालिका शाळांच्या मुलांसाठी उन्हाळी शिबीर सुद्धा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. महिला बचत गटासाठी आणि महिलांसाठी एक उद्योग केंद्र उभारण्याबरोबर विधवा महिलांसाठी बचतगट तयार करून त्या बचत गटांना कामे देण्याबाबतही बैठकीत निर्णय झाला. महिला बालकल्याण समिती सदस्यांच्या अनेक प्रश्नावर आयुक्त कापडणीस यांनी मार्ग काढत अनेक प्रश्नही या बैठकित मार्गी लावले. या बैठकीस महिला बालकल्याण समिती सदस्या रोहिणी पाटील, नसीमा नाईक, शुभांगी साळुंखे, गायत्री कल्लोळी, मदिना बारुदवाले, सविता मोहिते, स्वाती पारधी, सुनंदा राऊत, समिती सचिव स्मिता वाघमोडे आदी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.

.jpeg)