Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मनपा पॅथालॅाजी लॅबच्या चाचण्यांनी गाठला दैनंदिन २०० हून अधिक चाचण्यांचा टप्पा- आयुक्त नितीन कापडणीस

मनपा पॅथालॅाजी लॅबच्या चाचण्यांनी गाठला दैनंदिन २०० हून अधिक चाचण्यांचा टप्पा- आयुक्त नितीन कापडणीस


सांगली: ॲाक्टोबर २०२१ पासून नागरिकांच्या सेवेत असलेल्या त्रिकोणी बाग येथील मनपाच्या पॅथालॅाजी लॅबमध्ये काल एका दिवसात २०२ वैद्यकिय चाचण्या झाल्या. काही चाचण्या मोफत व काही अल्पदरात करण्याच्या मनपाच्या या उपक्रमाचा आजपर्यंत ७,९५८ नागरिकांनी लाभ घेतला असून आजपर्यंत या केंद्रात एकूण २२,४७९ चाचण्या करण्यात आल्या आहेत. केवळ मनपा क्षेत्रातीलच नव्हे तर जिल्ह्यातीलही अनेक नागरिक या केंद्राचा लाभ घेत असून.

 


या केंद्राचे तपासणी रिपोर्ट आता सर्वच दवाखान्यांमध्ये ग्राह्य धरले जात आहेत. या उपक्रमामुळे आजपर्यंत नागरिकांच्या ५० लक्षहून अधिक रूपयांची बचत झाली असून या केंद्रात चाचणी करण्यास अथवा अहवाल स्वीकारण्यास कोणत्याही रूग्णालयाने नकार दिल्यास तात्काळ मनपा प्रशासनाला कळवावे असे आवाहन मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.