Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शंभरावे आधिवेशन संस्मरणीय करु.. -ना. जयंतराव पाटील

शंभरावे आधिवेशन संस्मरणीय करु.. -ना. जयंतराव पाटील


सांगली दि. १:  दक्षिण भारत जैन सभेचे शंभरावे अधिवेशन सांगलीत होत आहे ही मोठी व अभिमानाची गोष्ट आहे. देशाच्या व कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या विकासात कायम उत्कृष्ट योगदान असलेल्या जैन समाजाचे अधिवेशनासाठी लागेल ती मदत करणार.. पालकमंत्री आणि व्यक्तिशः जयंत पाटील म्हणून अधिवेशनासाठी सहकार्य करणार आहे. अल्पसंख्याक जैन समाजाला कर्नाटक धर्तीवर महाराष्ट्रात शासकीय सवलती देण्यासाठी मंत्रालयीन संबंधित विभागाशी चर्चा करु.. अधिवेशन आणि मागण्या यासंदर्भात भालचंद्र पाटील व रावसाहेब यांना बरोबर घेऊन ना. उध्दव ठाकरे यांना भेटणार आहे असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील यांनी केले. ते दक्षिण भारत जैन सभेच्या शंभराव्या अधिवेशन आढावा संवाद बैठकीत बोलत होते. अध्यक्षस्थानी सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील होते.ना. जयंतराव पाटील यांचा सत्कार भालचंद्र पाटील यांनी केला. महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांचा सत्कार रावसाहेब पाटील यांनी केला. 

प्रारंभी स्वागत व प्रास्ताविकात सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी शंभरावे अधिवेशन का व कशासाठी.. जैन समाजातील समस्या.. अल्पसंख्याक म्हणून आवश्यक शासकीय सुविधा यांचा आढावा घेतला व या अधिवेशनाचे पालकत्व घेऊन भक्कम सहकार्य ना. जयंतराव यांनी करावे असे नमूद केले.  माजी महापौर सुरेश पाटील यांनी जैन समाजाला शासनाने भरीव मदत करावी असे आवाहन केले.

यावेळी ना. पाटील यांच्या हस्ते वाढदिवसानिमित्त डॉ. अजित पाटील व ए. ए. मुडलगी यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. अजित पाटील, रवी खोत, प्रणव चौगुले, डॉ. जयपाल चौगुले प्रशांत अवधूत, शशिकांत व संदीप राजोबा, आभार व सूत्रसंचालन अधिवेशन समितीचे सेक्रेटरी प्रा एन. डी. बिरनाळे यांनी केले. यावेळी संजय बजाज पद्माकर जगदाळे, मैनुद्दीन बागवान, सचिन जगदाळे, शेखर माने, राहुल पवार, प्रकाश रुकडे व दक्षिण भारत जैन सभा व शाखांचे पदाधिकारी आणि अधिवेशन समितीचे पदाधिकारी व विविध समित्यांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.