पर्यावरण दिनी महापालिकेकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन
- वयाने सर्वात मोठ्या वृक्षाचा वाढदिवस होणार तर पर्यावरण पूरक संदेश आणि मानवी साखळी बरोबर पर्यावरण दूतांच्या सन्मानाचे आयोजन
सांगली: सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून ५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सांगली शहरातील वयाने सर्वात मोठ्या वृक्षाचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. तर पर्यावरण पूरक संदेश कार्यक्रम आणि मानवी साखळीचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे.
याच कार्यक्रमात पंचतारांकित घरे व महापालिका घोषित पर्यावरण दूतांचा सन्मानही केला जाणार आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार आहे.
रविवार ५ जून २०२२ रोजी संध्याकाळी ५ वाजता आयएमए हॉल कॅम्पस, आमराई उद्यान जवळ सांगली येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी येताना हिरव्या रंगाचे कपडे (पुरुष- कुर्ता/ शर्ट, स्त्रिया-साडी/ड्रेस) परिधान करावेत. असे आवाहन उपायुक्त राहुल रोकडे आणि आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
