Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर

 संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर
पावसाळापूर्व नियोजनासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांनी घेतली आपत्ती व्यवस्थापन विभागाची तातडीची बैठक 1 जून पासून महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित होणार. पुढील आठवड्यापासून पूर पट्ट्यातील नागरिकांना नोटिसा बजावल्या जाणार. मनपाक्षेत्रात 9 मे पासून नालेसफाई सुरू होणार. 

आपत्ती काळासाठी सर्व आपत्कालीन यंत्रणाही सज्ज ठेवणेचे आदेश मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी घेतली सर्व विभागांची तातडीची बैठक


सांगली : संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.

पावसाळापूर्व  नियोजनासाठी मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाची तातडीची बैठक घेत अलर्ट राहणेबाबत सूचना केल्या आहेत. याचबरोबर 1 जूनपासून महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित करण्याचे आदेशही आयुक्त कापडणीस यांनी या बैठकीत दिले.

    संभाव्य पावसाळा आणि आपत्तीचीच्या पार्श्वभूमीवर आज आयुक्त नितीन कापडणीस यांनी सर्व विभाग प्रमुखांची मनपा मुख्यालयात तातडीची बैठक घेतली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संतोष खांडेकर, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके यांच्यासह सर्व सहायक आयुक्त, विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. 

 यावेळी आयुक्त कापडणीस यांनी आपत्ती तयारीचा आढावा घेतला. तसेच पुढील आठवड्यापासून पूर पट्ट्यातील नागरिकांना आपत्ती काळात सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याबाबतच्या नोटीसा बजावण्याच्या सूचनाही यावेळी सहायक आयुक्तांना केल्या. याचबरोबर संभाव्य पावसाळा लक्षात घेता 9 मे पासून मनपाक्षेत्राती नालेसफाई सुरू करण्याचे आदेशही दिले. आपत्ती काळासाठी सर्व आपत्कालीन यंत्रणाही सज्ज ठेवणेचे आदेश मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी प्रशासनाला दिले. पूर पट्ट्यात आणि मनपाक्षेत्रात असणाऱ्या धोकादायक झाडांचा सर्व्हे करून पावसाळ्यापूर्वी अशी धोकादायक झाडे काढणेबाबत , याचबरोबर अतिधोकादायक इमारत मालकांना तातडीने इमारत उतरण्याबाबत नोटिसा द्या आणि याबाबत स्थानिक पोलिसांना याबाबतची माहिती द्यावी. 

आपत्तीला सामोरे जाणेसाठी सज्ज व्हा असे सांगत पूरभागातील नागरिकाबरोबर येणाऱ्या पावसाळ्यात काय काळजी घ्यावी याबाबत आरोग्य विभागाने आतापासूनच जनजागृती सुरू करावी. याचबरोबर पावसाळ्या पूर्वी खासगी खुल्या अस्वच्छ जागा मालकांना नोटिसा बजावण्यात याव्यात आणि खुल्या जागा अस्वच्छ ठेवणाऱ्यावर प्रसंगी पोलिसात तक्रार दाखल करा. याचबरोबर मोकाट जनावरांच्या बाबतीत जनावर मालकांना नोटिसा बजावा. पूर काळात पाणी पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घेतली पाणीपुरवठा विभागाने घ्यावी आणि याबाबतच्या आवश्यक खबरदारी घ्यावी. हिराभाग येथील धोकादायक इमारती निष्काशीत करण्याबाबत महासभेला प्रस्ताव द्या. याचबरोबर जुन्या आणि ऐतिहासिक जलनिस्सारण वाहिन्या स्वच्छ करून घ्या. विद्युत विभागाने गंजलेल्या धोकादायक विजेचे खांब काढण्याची कारवाही तातडीने सुरू करा. अग्निशमन विभागाने आपत्ती नियंत्रण प्रात्यक्षिके  आयोजित करून सर्व सामाजिक संस्था, संघटना, शासकीय कार्यालय यांचा सहभाग घ्यावा. सर्व आपत्ती काळासाठी लागणारी अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवा अशा सूचनाही आयुक्त कापडणीस यांनी केल्या.

याचबरोबर आपत्ती बाबत जास्तीजास्त जनजागृती  करा जेणेकरून आपत्तीबाबत नागरिकांना वेळोवेळी याबाबत माहिती मिळेल. महापालिकेचे आपत्ती मित्र ऍप सुद्धा अपडेट ठेवा तसेच निवारा केंद्राची माहितीही अद्यावत करण्याबाबतचे आदेशही आयुक्त नितीन कापडणीस संबंधित विभागांना दिले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.