Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

काँग्रेस पक्षाचे काम तळागाळापर्यंत पोचवा - पृथ्वीराज पाटील प्रा. बिरनाळे, जंबगी, चव्हाण यांचा सत्कार

काँग्रेस पक्षाचे काम तळागाळापर्यंत पोचवा  - पृथ्वीराज पाटील प्रा. बिरनाळे, जंबगी, चव्हाण यांचा सत्कार


सांगली, दि. २ :  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शिक्षक सेलचे कार्याध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल प्रा. एन. डी. बिरनाळे तसेच काँग्रेस पक्षाच्या वक्ता सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी देवानंद जमगी आणि काँग्रेस सेलचे प्रदेश महासचिव म्हणून शरद चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला. काँग्रेस पक्षाचे काम तळागाळापर्यंत पोचवावे असे आवाहन श्री. पाटील यांनी यावेळी केले.

श्री. पाटील यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रा. बिरनाळे यांनी या सत्कारामुळे आम्हाला हत्तीचे बळ मिळाले आहे अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांनी मुंबईत काँग्रेस कमिटीच्या प्रदेश कार्यालयात पृथ्वीराज पाटील बाबांच्या शिफारशीनुसार माझी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शिक्षक सेल कार्याध्यक्ष म्हणून निवड  केली. त्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि काँग्रेस पक्षाचे काम करायला मला संधी मिळाली.

महाराष्ट्रभर काँग्रेस पक्षाचे कार्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आमदार नानाभाऊंनी काँग्रेस पक्षाचा वक्ता सेल गठीत करुन देवानंद जंबगी यांची वक्ता सेल प्रदेशाध्यक्ष व शरद चव्हाण यांची सेलचे प्रदेश सहसचिव म्हणून निवड केली.  यावेळी बिपीन कदम, रवी खराडे, विजय आवळे, प्रशांत देशमुख, शीतल सदलगे, अरविंद पाटील, आप्पासाहेब पाटील, रविंद्र वळवडे, बाबगोंडा पाटील व चेतन पाटील उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.