Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सांगली जिल्हा दौरा

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सांगली जिल्हा दौरा


सांगली दि. 14  : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज दिनांक 15 मे 2022 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

रविवार दिनांक 15 मे 2022 रोजी सकाळी 9.45 वाजता नरसिंहवाडी ता - शिरोळ जिल्हा - कोल्हापूर  येथून मोटारीने प्रयाण सकाळी 10 वाजता कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली नूतन प्रधान कार्यालय कोल्हापूर रोड सांगली येथे आगमन व कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली  प्रधान कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11.10 वाजता मोटारीने प्रयाण. सकाळी 11.15 वाजता कल्पद्रुम क्रीडांगण राजमती परिसर सांगली येथे आगमन व दक्षिण भारत जैन सभा शताब्दी महाधिवेशन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1.15 वाजता मोटारीने मा. नामदार राजेंद्र पाटील यांचे निवासस्थान यड्रावकर वाडा, कोल्हापूर - सांगली बायपास रोड, जैनापूर ता- शिरोळ जि - कोल्हापूरकडे प्रयाण

दुपारी 2.45 वाजता बालगंधर्व नाट्यगृह, मिरज जि - सांगली येथे आगमन व यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्कार कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3.45 मोटारीने प्रयाण. दुपारी 4.15 वाजता खटाव ता- पलुस येथे आगमन व राखीव. सायं.5.15 वाजता मोटारीने शासकीय विश्रामगृह कराडकडे प्रयाण.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.