Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नोकरी व स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांसाठी मंगळवारी ऑनलाईन मार्गदर्शन वेबीनार

 नोकरी व स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांसाठी मंगळवारी ऑनलाईन मार्गदर्शन वेबीनार


सांगली दि. 27 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली मार्फत नोकरी व स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांसाठी मंगळवार, दिनांक 31 मे 2022 रोजी सकाळी 11.30 ते 12.30 या वेळेत ऑनलाईन मार्गदर्शन वेबीनार आयोजित करण्यात आलेला आहे. अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी दिली.

या वेबीनारमध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजना व बॅक कर्ज प्रणाली, उद्योग व्यवसाय या विषयी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक विशाल पाटील प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. इच्छुक युवक व युवतींनी वेबीनारच्या meet.google.com/kup-yekb-zyy या लिंकवर दि. 31 मे 2022 रोजी विहीत वेळेपूर्वी 10 मिनिटे अगोदर सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. करीम यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.